शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सहा देशांकडून भारताची प्रशंसा....

By admin | Updated: March 15, 2015 00:07 IST

सहा प्रमुख देशांकडून भारताची प्रशंसा, १४ मार्च २०१५

सहा प्रमुख देशांकडून भारताची प्रशंसा, १४ मार्च २०१५

भारताची समर्थ वाटचाल जगासाठी हितावाह
सहा प्रमुख देशांच्या राजदूतांनी केली भारताच्या प्रगतीची प्रशंसा
नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेला गती देण्याकामी करण्यात आलेल्या भरकस प्रयत्नांबद्दल सहा प्रमुख देशांच्या राजदूतांनी भारताच्या नवीन सरकारची प्रशंसा केली आहे. एक महत्त्वाची भारत शक्ती म्हणून पुढे येणे; जगाच्या दृष्टीने चांगले आहे, असेही अमेरिका, जपान, चीन, ब्रिटन, जर्मनी आणि कॅनडा या देशांच्या राजूदतांनी आवर्जुन नमूद केले आहे.
दहशतवाद, हवामानातील बदलासह जगापुढील आव्हांनाचा मुकाबला करण्यात भारतची भूमिका महत्त्वाची आहे. व्यापार आणि आर्थिक क्षेत्राच्यादृष्टीनेभारतात मुबलक क्षमता आहे, अशा शब्दांत राजदूत आणि उच्चायुक्तांनी भारताच्या प्रगतीची प्रशंसा केली आहे.
अमेरिका आणि भारतादरम्यानची रणनीतिक भागीदारी परिपक्व होत नव्या टप्प्यात पोहोचली आहे. अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत भेटीने तर अनेक मुद्यांवरील कोंडी फुटली आहे. भारत आणि अमेरिकेने परस्पर सहकार्याने एकत्रित काम केल्यास जागतिक शांतता, लोकशाही आणि आर्थिक समृद्धीवर सकारात्मक परिणाम होईल, असे अमेरिकेचे राजदूत रिचर्ड वर्मा यांनी म्हटले आहे. इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये ते बोलत होते.
मेक इन इंडियासह स्मार्ट सिटीसह विविध प्रकल्पांना चीनमध्ये व्यापक पाठिंबा मिळाला आहे. यासाठी भारतासोबत सक्रिय होत काम करण्याची चीनची इच्छा आहे, असे चीनचे राजदूत लू यूचेंग म्हणाले.
जपानी उद्योगांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार भारत येत्या तीन वर्षात गुंतवणुकीच्या दृष्टीने सवार्ेत्कृष्ठ ठिकाण म्हणून नावारुपास येईल, असे जपानचे राजदूत ताकेशी यागी यांनी सांगितले.
समर्थ आणि सक्रिय भारत प्रत्येकासाठी हितावह आहे. उदयोन्मुख अर्थव्यवस्था म्हणूनच नव्हेंतर हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या आव्हानाचा मुकाबला करण्याकामी भारताला महत्त्वाची भूमिका पार पाडायची आहे, अशा शब्दात ब्रिटनचे उच्चायुक्त जेम्स बेव्हन यांनी भारताचे महत्त्व अधोरेखित केले. बलात्काराच्या घटनांबाबत कोणीही तटस्थ राहू शकत नाही. ब्रिटनही भारताप्रमाणेमहिलाविरोधी अत्याचाराचा लढा देत आहे.
जगापुढील आव्हांनावर मात करण्याकामी भारताची भूमिका महत्त्वपूर्ण असेल, असे कॅनडाचे उच्चायुक्त नादीर पटेल म्हणाले. ऑस्ट्रेलियाचे उच्चायुक्त पॅट्रीक सक्लींग यांनीही जगाच्या वाटचालीतील भारताचे महत्त्व स्पष्ट केले.