शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
5
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
6
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
7
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
8
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
9
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
10
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
11
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
12
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
13
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
14
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
15
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
16
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
17
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
18
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
19
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
20
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल

"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 00:50 IST

Pakistan official Beggars, Asaduddin Owaisi: दहशतवाद्यांना पोसणाऱ्या देशाला अब्ज डॉलर्सचं लोन कसं देतात, असाही सवाल केला

Pakistan official Beggars, Asaduddin Owaisi: दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला युद्धाच्या तोंडावर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने २.३ अब्ज डॉलर्स एवढ्या मोठ्या किंमतीची दोन पॅकेज मंजूर केली आहेत. IMF मध्ये भारताने हा पैसा पाकिस्तानला देण्यास विरोध केला होता. तसेच मतदानास अनुपस्थित राहिला होता. पाकिस्तान हा पैसा दहशतवाद्यांवर खर्च करणार असा इशाराही भारताने दिला होता. तरीही हे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे IMF कडून पाकिस्तानला तातडीने १ अब्ज डॉलर्स म्हणजेच ८,५०० कोटी रुपये दिले जाणार आहेत. भारताविरोधात शस्त्रास्त्रे मिळविण्यासाठी पाकिस्तान या पैशांचा वापर करणार असा आंतरराष्ट्रीय जाणकारांचे मत आहे. याच दरम्यान, AIMIM पक्षाचे असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानला 'ऑफिशियल भिकमंगे' म्हटले आहे.

पाकिस्तानी म्हणजे 'ऑफिशियल भिकमंगे'

"भिकमंगे आहेत ही लोकं. माझ्यावर विश्वास ठेवा, पाकिस्तानी ऑफिशियल भिकमंगे आहेत. आता ते IMF कडून एक बिलियन डॉलर्सचे कर्ज घेत आहेत. ७५ वर्षांपासून तुम्ही काय केलंत? तुम्हाला IMF कडून कर्ज काढण्यासाठी कुणी भरीस पाडलं? मला नवल हे वाटतं की IMF त्यांना जे लोन देतंय ते International Monetary Fund नाही, International Militant Fund म्हणजेच दहशतवादासाठी कर्ज दिल्यासारखं आहे. पाकिस्तान याचा वापर दहशतवादी कारवायांसाठीच करणार. अमेरिका, जर्मनी, जपान या देशांनी हे कर्ज देण्यासाठी कसेकाय होकार दिला कळतंच नाही. आमच्या (भारताच्या) जमिनीवर, घरांवर, सैनिकांवर हल्ले होत आहेत आणि यांनी १ बिलियनचे कर्ज दिले जात आहे," असे ओवेसी म्हणाले.

भारतातील हिंदू-मुस्लीम यांच्यात भांडणं लावणं पाकिस्तानचं काम

"पाकिस्तानींसाठी सरकार चालवणं तर दूरच राहिलं, त्यांना साधी अर्थव्यवस्था कशी चालवायची याची अक्कल नाही. तुम्ही केवळ एका ठिकाणी बसून म्हणताय की इस्लाम असं आहे, इस्लाम तसं आहे... पण या सगळ्या तुमच्या चुकीच्या योजना आहेत. तुम्ही भारताची शांतता भंग करण्यासाठी आणि हिंदू-मुस्लीम यांच्यात भांडणं लावण्याची कामं करत आहात. विचार करण्यासाठी बाब आहे की, मुरीकदे आणि बहावलपूरमध्ये जे दहशतवादी मारले गेले त्यांच्या अंत्यसंस्काराला अमेरिकेतील वॉन्टेड दहशतवादी नमाज जनाजा पठण करत होता. त्याच्या पाठीमागे पाकिस्तानची फौज उभी होती," यावरूनही ओवेसींनी पाकिस्तानवर टीका केली.

दरम्यान, पाकिस्तानला कर्ज मंजूर करण्याबाबतच्या IMF च्या मतदानात भारताने गैरहजर राहण्याचा निर्णय घेतला होता. कारण IMF च्या नियमांनुसार औपचारिक "नाही" असे मत देण्याची मतदानात परवानगी नसते.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनPakistanपाकिस्तानIndiaभारत