शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
2
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
3
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
4
“पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
5
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
6
Operation Sindoor: मोठी बातमी! कंदहार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
7
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
8
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानच्या दोन मित्रराष्ट्रांचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर, जयशंकर यांची भेट
9
Operation Sindoor : एअर स्ट्राइक दिवशी झाला जन्म, कुटुंबीयांनी मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले
10
तुम्हीही वारंवार पर्सनल लोन घेता? मग 'हे' ५ मोठे तोटे समजून घ्या; अनेकजण करतात दुर्लक्ष
11
Mumbai: पत्नीची हत्या करून मृतदेह बेडमध्ये लपवला, मुंबईतील गोरेगाव येथील धक्कादायक प्रकार
12
"मी रात्रभर त्यांच्या फोनची वाट पाहिली, पण..."; ढसाढसा रडली शहीद दिनेश कुमार यांची पत्नी
13
"तुमच्या हातात माईक दिलाय म्हणून तुम्ही काहीही बडबडू नका..."; रोहित शर्मा समालोचकांवर भडकला
14
'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच! किती आतंकवादी मारले? संरक्षण मंत्र्यांनी आकडाच सांगितला!
15
Swami Samartha: स्वामींची निरपेक्ष सेवा केलीत तर 'या' दोन गोष्टी तुम्हाला आयुष्यात मिळणारच!
16
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
17
पाकिस्तानच्या शेअर बाजारात भूकंप! कराची बाजारातील व्यवहार अचानक बंद; नेमकं काय घडलं?
18
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
19
२००० किमी प्रवास, आळीपाळीने चालवत होते कार; एका डुलकीनं थांबवला ६ जणांच्या आयुष्याचा प्रवास
20
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...

India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल हल्ले, पण लष्कराने हाणून पाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 15:42 IST

India Pakistan Tension: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्या तणाव निर्माण झाला होता. भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तान पिसाळला आहे.

भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान वेडापिसा झाला आहे. भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्काराकडून अंदाधूंद गोळीबार केला जात आहे. जम्मू आणि काश्मीर, पंजाबमधील सीमेवरील गावांमध्ये उखळी तोफा आणि तोफगोळे डागण्याचे प्रयत्न झाले. ७ आणि ८ मे च्या रात्री पाकिस्तानकडून जम्मू आणि काश्मीरमध्ये काही हल्ले करण्याचे प्रयत्न झाले, पण भारतीय लष्कराने पाकिस्तानचे प्रयत्न हाणून पाडले आहेत. संरक्षण मंत्रालयाने याबद्दलची माहिती दिली आहे. (Pakistan attempted to engage a number of military targets in Northern and Western India)

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी याबद्दलची माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारताने पाकिस्तान लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले नव्हते. पण, पाकिस्तान लष्कराकडून जर भारतीय लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले, तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल. 

पाकिस्तानकडून मध्यरात्री हल्ल्याचे प्रयत्न

अधिकाऱ्यांनी सांगितले की, ७ आणि ८ मे रोजीच्या मध्यरात्री पाकिस्तानने उत्तर आणि पश्चिमेकडील काही लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न केले. यात अवंतीपोरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, अदमपूर, भटिंडा, चंदीगढ, नाल, फलौदी, उत्तरलाई आणि भूज या ठिकाणांचा समावेश आहे. 

पाकिस्तानने ड्रोन आणि मिसाईल हल्ले करण्याचा प्रयत्न केला. यूएसए ग्रीड आणि हवाई संरक्षण सिस्टिमच्या मदतीने त्यांच्या मिसाईल आणि ड्रोन पाडण्यात आले. अनेक ठिकाणी पाडण्यात आलेल्या ड्रोन्स आणि मिसाईलचे सांगाडे सापडले आहेत. त्यातून पाकिस्तानकडून हल्ले करण्यात आल्याचे सिद्ध झाले आहे. 

लाहोरमधील एअर डिफेन्स रडार केले निकामी

अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीय लष्कराने पाकिस्तानची ठिकठिकाणची हवाई संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त केले. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याप्रमाणेच भारताने उत्तर दिले. जी माहिती मिळाली आहे, त्यानुसार लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टिम निकामी करण्यात यश आले आहे. 

पाकिस्तानच्या गोळीबारात १६ नागरिकांचा मृत्यू 

अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाकिस्तानी लष्कराकडून सीमेलगतच्या गावात अंदाधूं गोळीबार केला जात आहे. यात आतापर्यंत १६ नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. यात तीन महिला आणि पाच लहान मुलांचा समावेश आहे. भारतीय जवानही पाकिस्तानच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देत आहेत. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक