India-Pakistan Tension:भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल नवीन माहिती दिली.
पाकिस्तान खोट्या बातम्या पसरवत आहेपरराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले, पाकिस्तानने आपल्या कुरापती मान्य करण्याऐवजी, हास्यास्पद आणि अपमानजनक दावा केला आहे की, भारतीय सशस्त्र दल अमृतसरसारख्या आपल्याच शहरांना लक्ष्य करत आहेत आणि पाकिस्तानवर दोषारोप ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. पाकिस्तानचा इतिहास पाहिला तर, ते अशा कृती करण्यात पटाईत आहेत. भारताने ड्रोन हल्ल्याद्वारे नानकाना साहिब गुरुद्वाराला लक्ष्य केल्याची चुकीची माहिती पाकिस्तानने पसरवली आहे. जातीय वाद निर्माण करण्याच्या उद्देशाने पाकिस्तान परिस्थितीला सांप्रदायिक करण्याचा प्रयत्न करत आहे. सध्याच्या सुरक्षा परिस्थिती पाहता, पुढील सूचना मिळेपर्यंत कर्तारपूर साहिब कॉरिडॉरच्या सेवा निलंबित करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
भारताची आयएमएफ बैठकीवर नजर भारतासोबत सुरू असलेल्या लष्करी कारवाईदरम्यान, आज आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) पाकिस्तानला देण्यात येणाऱ्या कर्जाचा आढावा घेणार आहे. विक्रम मिस्री म्हणाले की, आयएमएफची बैठक सुरू आहे, आम्ही तिथे आमचे मते मांडू. सिंधू पाणी करार सध्या स्थगित राहील. प
भारताने अमेरिकेशी काय चर्चा केली?परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांशी चर्चा केली आहे. 7 मे रोजी पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताच्या कारवाईवर चर्चा झाली. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारतासोबत काम करण्याच्या अमेरिकेच्या वचनबद्धतेचे परराष्ट्रमंत्र्यांनी कौतुक केले. पाकिस्तानकडून कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यांना भारत जोरदार प्रत्युत्तर देईल, असे परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेला सांगितले. आज जयशंकर यांनी ब्रिटिश परराष्ट्रमंत्र्यांशी आणि नॉर्वेच्या परराष्ट्रमंत्र्यांशीही चर्चा केल्याची माहिती मिस्त्री यांनी दिली.
पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात 4 जवान शहीदविंग कमांडर व्योमिका सिंह यांनी सांगितले की, पाकिस्तानी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानच्या चार हवाई संरक्षण प्रणालींवर सशस्त्र ड्रोनने गोळीबार करण्यात आला. यापैकी एक ड्रोन एडी रडार नष्ट करण्यात यशस्वी झाला. पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर तोफखाना आणि सशस्त्र ड्रोन वापरून गोळीबार केला. यामध्ये काही भारतीय लष्कराचे जवान मृत्युमुखी पडले आणि जखमी झाले. यात भारतीय लष्कराचे चार जवान शहीद झाले आणि दोन शाळकरी मुलांना आपला जीव गमवावा लागला. भारताच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानी सैन्याचेही मोठे नुकसान झाले.