शहरं
Join us  
Trending Stories
1
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
2
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
3
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
4
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
5
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
6
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
7
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीसोबत करणार हातमिळवणी?
8
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
9
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
10
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
11
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
12
India Pakistan Update: हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी ओझरचे एचएएल 'हाय अलर्ट'वर !
13
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
14
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
15
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
16
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
18
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
19
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
20
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."

पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 17:29 IST

India-Pakistan Tension: भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर जागतिक बँक आपल्याला मदत करेल, अशी पाकिस्तानला आशा होती.

India-Pakistan Tension: भारतासोबत सुरू असलेल्या तणावानंतर पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानसोबत 1960 चा सिंधू पाणी करार रद्द केला. त्यानंतर पाकिस्तानी तज्ज्ञ म्हणत होते की, भारत हा करार एकतर्फी रद्द करू शकत नाही, या कराराची मध्यस्थी करणारी जागतिक बँक भारताला करार स्थगित करण्याचा निर्णय बदलण्यास भाग पाडेल. पण आता जागतिक बँकेने पाकिस्तानला धक्का जाहिरपणे भारताची बाजू घेतली आहे.

जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट घेतली. बैठकीत काय घडले याची माहिती उपलब्ध नाही, मात्र सीएनबीसी-टीव्ही18 शी बोलताना बंगा म्हणाले की, हा करार दोन्ही देशांमधील आहे. जागतिक बँकेची भूमिका केवळ वाद सोडवण्यासाठी तटस्थ तज्ञ किंवा मध्यस्थी म्हणून असते. द्विपक्षीय मुद्द्यांमध्ये मध्यस्थाव्यतिरिक्त संस्थेची कोणतीही भूमिका नाही.

दरम्यान, याबाबत भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, पाकिस्तान अनेक वर्षांपासून अडथळे निर्माण करत होता. आम्ही त्यांना अनेक पत्रे पाठवली, ज्यात करारातील सुधारणांवर वाटाघाटी करण्याची विनंती केली होती. भारताने सहा दशकांहून अधिक काळ या कराराचा आदर केला आहे, पण पाकिस्तान नेहमी या कराराचे उल्लंघन करायचा, त्यामुळे भारताला सिंधू पाणी करार स्थगित करावा लागला. 

काय आहे सिंधू करार?जागतिक बँकेच्या मध्यस्थीने 19 सप्टेंबर 1960 रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये सिंधू पाणी करारावर स्वाक्षरी झाली. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती अयुब खान यांनी कराची येथे करारावर स्वाक्षरी केली. या करारांतर्गत, दोन्ही देशांनी सिंधू आणि तिच्या उपनद्यांचे पाणी - रावी, बियास, सतलज, झेलम, चिनाब आणि काबूल - वाटप करण्यावर सहमती दर्शविली होती. या करारानुसार, भारताला रावी, बियास आणि सतलज या तीन पूर्वेकडील नद्यांच्या पाण्यात प्रवेशाची परवानगी होती, तर पाकिस्तानला सिंधू, चिनाब आणि झेलम या पश्चिमेकडील नद्यांचे पाणी मिळाले.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानIndiaभारतWorld Bankवर्ल्ड बँक