भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पिसाळलेल्या पाकिस्ताननेभारताच्या सीमेलगतच्या राज्यांवर हवाई हल्ले करण्यास सुरुवात केली आहेत. त्यानंतर भारतानेही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही बाजूंनी युद्धाची अधिकृत घोषणा झाली नसली तरी प्रचंड संघर्ष सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या अफवा पसरत असून, त्यामुळे सामान्य माणूस गोंधळून जात आहे. दरम्यान, या युद्धसदृश परिस्थितीतमध्ये कोणती खबरदारी घेतली पाहिजे याची थोडक्यात माहिती पुढील प्रमाणे.
युद्ध काळात काय करू नये-सर्वप्रथम तुम्ही जिथे राहता त्या शहराचं लोकेशन, ब्लॅकआऊटची माहिती आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करू नका.- जर तुमच्या शहरात किंवा आजूबाजूच्या परिसरात लष्कराचं कुठलंही वाहन दिसलं तर त्याचा व्हिडीओ काढू नका- युद्धाबाबत सोशल मीडियावर बरेचसे जुने फोटो ताजे फोटो म्हणून शेअर केले जात आहेत, अशा अफवांकडे दुर्लक्ष करा. -गरज नसेल तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, तसेच आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका-चुकीच्या माहितीबाबत प्रतिक्रिया देऊ नका, भीती आणि आक्रोषित होऊन कुठलंही बेकायदेशीर पाऊल उचलू नका.-सुरक्षा दलांच्या कामामध्ये अडथळे आणू नका. त्यांनी दिलेल्या आदेशांचं पालन करा
युद्धकाळात या गोष्टी अवश्य करा - सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करा, केवळ सरकारी संस्था, लष्कर, स्थानिक प्रशासन या विश्वसनीय संस्थांनी दिलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा,- आणीबाणीच्या परिस्थितीसाठी तयार राहा, आवश्यक औषधे, कागदपत्रे, पाणी आणि सुकं धान्य गोळा करून ठेवा-सुरक्षित ठिकाणांची ओळख पटवा आणि घर किंवा गल्लीत असलेला बंकर किंवा भक्कम बांधकाम असलेल्या सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या- सर्वात महत्त्वाचं म्हणजे शांतता बाळगा, अफवा टाळा आणि सामाजिक सौहार्द टिकवून ठेवा- वृद्ध, मुले आणि अपंगांना प्राधान्य द्या आणि गरज भासल्यास त्यांना मदत करा.