India Pakistan Conflict ( Marathi News ) : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. गेल्या चार दिवसापासून सीमेवर गोळीबार झाल्याचे समोर आले, या हल्ल्याला भारतीय लष्करानेही चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान, काल अमेरिकेने मध्यस्ती करत 'युद्धविराम 'ची घोषणा केली. दरम्यान, एआयएमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी सरकारला एक सवाल केला आहे.
वारिस पठाण यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करु सवाल उपस्थित केले, "एक प्रश्न, पहलगाममधील त्या क्रूर दहशतवाद्यांचे काय झाले ज्यांनी निष्पाप पर्यटकांचे नाव आणि धर्म विचारून त्यांची हत्या केली? त्यांना पकडले गेले का? त्यांना मारले गेले का?", असा सवाल वारिस पठाण यांनी केला.
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस?
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादी कुठे गेले?
हल्ल्यानंतर पहलगाममध्ये घुसलेले दहशतवादी घनदाट जंगलात लपले असल्याची भीती सुरक्षा यंत्रणांना होती. काश्मीरमधील स्थानिक लोकांनी किंवा कामगारांनी त्यांना मदत केली असावी, तरच त्यांना सीमा ओलांडून लपणे शक्य झाले. हल्ल्यानंतर, भारतीय सुरक्षा दलांनी कठोर कारवाई केली.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ जमांची हत्या केली. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने 'ऑपरेश सिंदूर' मोहिम राबवली. या अंतर्गत लष्कराने पाकिस्तानमधील ९ दहशवादी तळांवर हल्ला केला.
भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना ठार मारण्याचे धाडस दाखवले. यानंतर पाकिस्तानने हल्ले करण्यास सुरूवात केली. या हल्ल्याला भारतीय लष्कराने प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानकडून येणारे बहुतेक ड्रोन आणि क्षेपणास्त्रे रोखली आणि त्यांना योग्य प्रत्युत्तर दिले.
यानंतर, शनिवारी (१० मे) संध्याकाळी ५:०० वाजता युद्धबंदी करार झाला. असे असूनही, पाकिस्तानने आपल्या नापाक कारवाया थांबवल्या नाहीत आणि काही तासांनंतर युद्धबंदीचे उल्लंघन केले.