पहलगाम दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला. यामध्ये २६ जणांना आपला जीव गमवावा लागला. पर्यटकांना वाचवताना आपला जीव गमावलेल्या आदिल हुसेनचा भाऊ नौशाद हुसेन यांनी भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'चं कौतुक केलं आहे. माझ्या भावासह २६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतल्याबद्दल आम्हाला सैन्य आणि पंतप्रधान मोदींचा अभिमान आहे, असंही नौशाद यांनी म्हटलं.
वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना सय्यद नौशाद हुसेन शाह म्हणाले की, "ऑपरेशन सिंदूर करून लोकांच्या हत्येचा बदला घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लष्कराचे मी आभार मानू इच्छितो. आम्हाला लष्कर आणि पंतप्रधान मोदी यांचा खूप अभिमान आहे."
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
"दहशतवाद पूर्णपणे संपवायचा आहे"
"आम्हाला जम्मू आणि काश्मीरमधून दहशतवाद पूर्णपणे संपवायचा आहे जेणेकरून पुन्हा कधीही कोणीही मारलं जाऊ नये. आम्हाला सरकार आणि पंतप्रधान मोदींकडून खूप अपेक्षा होत्या आणि त्यांनी आमच्या भावासह सर्व २६ लोकांच्या मृत्यूचा बदला घेऊन त्यांनी दाखवून दिलं आहे. यानंतर आता २६ लोकांच्या आत्म्यांनाही शांती मिळेल."
"शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
"मोदी जे काही करतील ते योग्यच असेल"
"सरकारने जे काही केलं आहे ते योग्य आहे. पंतप्रधान मोदी जे काही करतील ते योग्यच असेल. हे आपल्या सर्वांसाठी चांगलं असेल" असं नौशाद हुसेन यांनी म्हटलं आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी सय्यद आदिल हुसेन शाह हा एक होता, ज्याने पर्यटकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा दहशतवाद्यांनी त्याला गोळ्या घालून मारलं.