शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
8
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
9
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
10
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
11
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
12
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
13
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
14
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
15
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
16
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
17
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
18
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
19
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
20
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?

उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 13:24 IST

VP Election: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे बी सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा केली आहे. विरोधी पक्षांनी एकमताने रेड्डी यांची निवड केल्याचे ते म्हणाले. 

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर केलेली असताना आता इंडिया आघाडीनेही विरोधकांचा उमेदवार जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी हे इंडिया आघाडीचे उमेदवार असणार आहेत. 

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे बी सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा केली आहे. विरोधी पक्षांनी एकमताने रेड्डी यांची निवड केल्याचे ते म्हणाले. 

बी सुदर्शन रेड्डी हे मुळचे आंध्र प्रदेशातील रंगा रेड्डी जिल्ह्यातील आहेत. त्यांचा जन्म ८ जुलै १९४६ रोजी झाला होता. शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. ते भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि गोव्याचे पहिले लोकायुक्त राहिले आहेत. १९७१ मध्ये हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले आहे. सुदर्शन रेड्डी यांची १२ जानेवारी २००७ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि ते ८ जुलै २०११ रोजी निवृत्त झाले. निवृत्तीनंतर, त्यांनी मार्च २०१३ मध्ये गोव्याचे पहिले लोकायुक्त म्हणून पदभार स्वीकारला, जरी त्यांनी वैयक्तिक कारणांमुळे ऑक्टोबर २०१३ मध्ये राजीनामा दिला होता.

राधाकृष्णन एनडीएचे उमेदवारचंद्रपुरम पोन्नूस्वामी राधाकृष्णन असे महाराष्ट्राच्या राज्यपालांचे नाव असून ते मुळचे तामिळनाडूचे आहेत. राधाकृष्णन यांनी त्यांच्या राजकीय प्रवासात अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. त्यांनी ३१ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी त्यांनी १८ फेब्रुवारी २०२३ ते ३० जुलै २०२४ पर्यंत झारखंडचे राज्यपाल म्हणून काम पाहिले होते. मार्च ते जुलै २०२४ पर्यंत तेलंगणाचे राज्यपाल आणि मार्च ते ऑगस्ट २०२४ पर्यंत पाँडिचेरीचे उपराज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार सांभाळला आहे. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूक 2024INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडी