आज दिल्लीत इंडिया आघाडीची चौथी बैठक, २८ पक्षांचे नेते एकत्र येणार; जागावाटपावर चर्चा होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 08:48 AM2023-12-19T08:48:30+5:302023-12-19T08:49:22+5:30

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर आता इंडिया आघाडीची दिल्लीत चौथी बैठक होणार आहे.

INDIA Opposition Alliance fourth meeting in Delhi today, leaders of 28 parties will gather; There will be a discussion on seat allocation | आज दिल्लीत इंडिया आघाडीची चौथी बैठक, २८ पक्षांचे नेते एकत्र येणार; जागावाटपावर चर्चा होणार

आज दिल्लीत इंडिया आघाडीची चौथी बैठक, २८ पक्षांचे नेते एकत्र येणार; जागावाटपावर चर्चा होणार

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपल्या, या राज्यांचे निकालही समोर आले. या निवडणुकीत भाजपने जोरदार विजय मिळवला. आता देशातील विरोधी पक्ष पुन्हा एकत्र येणार आहे, आज दिल्लीतइंडिया आघाडीची बैठक होणार आहे. यापूर्वी पाटणा, बेंगळुरू आणि मुंबई येथे आघाडीच्या बैठका झाल्या. बैठकीच्या एक दिवस आधी आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव, जेडीयू नेते नितीश कुमार, टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी दिल्लीत पोहोचले. सोमवारी नितीश कुमार आणि ममता बॅनर्जी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. आज मंगळवारी दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये बैठक होणार आहे. दुपारी ३ वाजता बैठक सुरू होईल.

अभियान काँग्रेसचे अन् डोमेनचे मालक भाजप! 'डोमेन फॉर देश' मोहिमेत झाला मोठा गोंधळ

या बैठकीत २८ पक्षांचे प्रमुख आणि त्यांच्या नेत्यांचा समावेश असेल. बैठकीच्या माध्यमातून विरोधी पक्षांची पुन्हा एकजूट करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पाच राज्यातील निवडणुकीत सपा-काँग्रेस आणि इतर पक्ष आमनेसामने दिसले आहेत.

दरम्यान, या बैठकीत जागा वाटपावर चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे. I.N.D.I.A आघाडी जानेवारी किंवा फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांची नावे जाहीर करू शकते. आघाडीच्या पक्षांनी आधीच स्पष्ट केले आहे की जागावाटप सुनिश्चित करण्यासाठी राज्यांमध्ये उपसमित्यांची स्थापना केली जाईल.
 
मुख्यमंत्री केजरीवाल यांनी घेतली ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरेंची भेट

सोमवारी संध्याकाळी आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि शिवसेना (UBT) अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. टीएमसी खासदार आणि बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांच्या साऊथ एव्हेन्यू निवासस्थानी सुमारे ४५ मिनिटांच्या बैठकीत झालेल्या चर्चेवर केजरीवाल यांनी कोणतेही भाष्य केले नाही. यानंतर केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह इतर शिवसेना नेत्यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

मुख्यमंत्री केजरीवाल मंगळवारी युतीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. इंडिया आघाडीची बैठक ६ डिसेंबरला होणार होती ही  बैठक पुढे ढकलण्यात आली.

Web Title: INDIA Opposition Alliance fourth meeting in Delhi today, leaders of 28 parties will gather; There will be a discussion on seat allocation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.