शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! कंधार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
3
Operation Sindoor : एअर स्ट्राइक दिवशी झाला जन्म, कुटुंबीयांनी मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले
4
"मी रात्रभर त्यांच्या फोनची वाट पाहिली, पण..."; ढसाढसा रडली शहीद दिनेश कुमार यांची पत्नी
5
"तुमच्या हातात माईक दिलाय म्हणून तुम्ही काहीही बडबडू नका..."; रोहित शर्मा समालोचकांवर भडकला
6
'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच! किती आतंकवादी मारले? संरक्षण मंत्र्यांनी आकडाच सांगितला!
7
Swami Samartha: स्वामींची निरपेक्ष सेवा केलीत तर 'या' दोन गोष्टी तुम्हाला आयुष्यात मिळणारच!
8
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
9
पाकिस्तानच्या शेअर बाजारात भूकंप! कराची बाजारातील व्यवहार अचानक बंद; नेमकं काय घडलं?
10
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
11
२००० किमी प्रवास, आळीपाळीने चालवत होते कार; एका डुलकीनं थांबवला ६ जणांच्या आयुष्याचा प्रवास
12
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
13
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
14
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
15
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
16
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
17
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
18
Rohit Sharma Retires: 'आई, माझं स्वप्न भंगलं' रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर ढसाढसा रडली तरुणी, व्हिडीओ व्हायरल
19
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
20
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई

आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 15:27 IST

भारतातील निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकण्यासाठी भारताने पुन्हा एकदा चिनाबचा आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतातील निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकण्यासाठी भारताने पुन्हा एकदा चिनाबचा आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे. बगलिहार आणि सलाल धरणाचे दरवाजे गरुवारी उघडण्यात आले आहेत. यामुळे आता पाकिस्तानमधील वेगवेगळ्या भागात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

सीमावर्ती भागातील त्यांच्या लष्करी कारवायांवरही याचा परिणाम झाला आहे. गेल्या काही दिवसांत भारताने पाकवर पाणी हल्ला करण्याची ही दुसरी वेळ आहे. रविवारी याआधी भारत सरकारने चिनाब नदीच्या पाण्याचा प्रवाह थांबवला होता, ज्यामुळे पाकिस्तानमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यांचे विविध जलविद्युत प्रकल्प बंद करण्यात आले होते. मात्र, भारताने दुसऱ्या दिवशी पाणी सोडले. ऑपरेशन सिंदूरमुळे निराश झालेल्या पाकिस्तानने मंगळवारी रात्रीपासून भारताच्या सीमावर्ती भागात गोळीबार सुरू केला आहे. या गोळीबारात एक जवान शहीद झाला असून, १४ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

या हल्ल्यात जवळपास १०० नागरिक जखमी झाले आहेत. संबंधित सूत्रांनी सांगितले की, काल रात्री रियासीच्या दोडा-किश्तवारमध्ये मुसळधार पाऊस पडला. यामुळेच, बगलियार आणि सलाल धरणातील पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यासाठी बांधलेले दोन अतिरिक्त दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे रियासीच्या खाली अखनूरमध्ये पाण्याची पातळी २० फुटांपेक्षा जास्त वाढली आहे.

पाकिस्तानात पाणीच पाणी!

यामुळे अखनूरच्या खाली असलेल्या पाकिस्तानी भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. याची अद्याप पुष्टी झालेली नसली तरी, सूत्रांनी सांगितले की चिनाब पाणलोट क्षेत्रात असलेल्या गढखल आणि परगवाल सेक्टरमधील काही पाकिस्तानी चौक्या पाण्याखाली गेल्या आहेत.

सिंधू पाणी करारांतर्गत, चिनाब नदीचे पाणी रोखण्यापूर्वी किंवा त्यावर बांधलेल्या धरणांमधून अचानक पाणी सोडण्यापूर्वी पाकिस्तानला माहिती देण्यात येत होती. आता हा करार स्थगित करण्यात आला आहे, त्यामुळे आता त्याची माहिती पाकला दिली जाणार नाही. आता भारत जेव्हा हवे, तेव्हा पाकिस्तानमध्ये दुष्काळ आणि पूर परिस्थिती निर्माण करू शकतो.

टॅग्स :India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तान