शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 08:35 IST

Brahmaputra river latest news : ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे काळजीपूर्वक लक्ष आहे. यात चीनच्या जलविद्युत प्रकल्प विकसित करण्याच्या योजनांचाही समावेश आहे. याबरोबरच भारत सरकार आपल्या हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करीत आहे. 

हरीश गुप्ता

नवी दिल्ली : व्यापाराच्या मुद्द्यावर अमेरिकेशी तणाव वाढलेला असतानाच भारत सरकार चीनशी असलेल्या द्विपक्षीय संबंधांबाबत अत्यंत सावध आहे. अरुणाचल प्रदेशजवळ ब्रह्मपुत्रा नदीवरचीनने एका मोठ्या जलविद्युत प्रकल्पाचे बांधकाम सुरू केले आहे का, असा प्रश्न संसदेत गुरुवारी विचारण्यात आला होता, तेव्हा वरील बाब पुढे आली. परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह म्हणाले की, तिबेटमधील यारलुंग त्सांगपो नदीच्या खालच्या भागात (म्हणजेच ब्रह्मपुत्राच्या वरच्या भागात) चीनने एक महाकाय धरण प्रकल्प बांधण्यास सुरुवात केल्याच्या वृत्तांची सरकारने दखल घेतली आहे.

ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे काळजीपूर्वक लक्ष आहे. यात चीनच्या जलविद्युत प्रकल्प विकसित करण्याच्या योजनांचाही समावेश आहे. याबरोबरच भारत सरकार आपल्या हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करीत आहे. 

चीनला सांगितली चिंतासीमापार नद्यांशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी २००६ मध्ये स्थापन झालेल्या यंत्रणेमार्फत तसेच राजनैतिक मार्गांद्वारे चीनशी चर्चा केली जाते. मंत्री म्हणाले की, सीमापार नद्यांच्या पाणीहक्काबाबत भारताने चीनच्या अधिकाऱ्यांना सातत्याने आपले विचार आणि चिंता कानावर घातल्या आहेत. यात पारदर्शकता आणि संबंधित देशाशी सल्ला-मसलत करण्याची गरजही व्यक्त केलेली आहे. त्यांच्या कोणत्याही प्रकल्पांमुळे किंवा उपक्रमांमुळे नदीचे पाणी मिळणाऱ्या देशांच्या हिताला हानी पोहोचणार नाही, याची खात्री करण्याचेही आवाहन केलेले आहे.

टॅग्स :chinaचीनriverनदीIndiaभारतArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश