शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोरीत भारत नंबर १; भ्रष्टाचाराचे 'हे' आकडे डोळे विस्फारणारे

By मोरेश्वर येरम | Updated: November 26, 2020 12:00 IST

गेल्या १२ महिन्यांमध्ये देशात भ्रष्टारात वाढ झाल्याचं ४७ टक्के लोकांचं मत आहे. तर ६३ टक्के लोकांना वाटतं की भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी सरकार चांगलं काम करत आहे.

ठळक मुद्देआशिया खंडातील देशांमध्ये केलं गेलं सर्वेक्षणभारत पहिल्या क्रमांकावर तर कंबोडियाचा दुसरा नंबर, इंडोनेशिया तिसऱ्या स्थानीजापान आणि मालदिवमध्ये सर्वात कमी भ्रष्टाचार

नवी दिल्लीलाचखोरीत भारताची परिस्थिती आशिया खंडातील देशांमध्ये सर्वात वाईट आहे. लाचखोरीच्याबाबतीत आशिया खंडातील देशांमध्ये भारताचा पहिला क्रमांक लागतो. 'ट्रान्फरन्सी इंटरनॅशनल' संस्थेच्या याबाबतचे सर्वेक्षण प्रसिद्ध केले आहे. यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

घुसखोरीच्या बाबतीत भारतात घुसखोरीचा दर हा ३९ टक्के इतका आहे. गेल्या १२ महिन्यांमध्ये देशात भ्रष्टारात वाढ झाल्याचं ४७ टक्के लोकांचं मत आहे. तर ६३ टक्के लोकांना वाटतं की भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी सरकार चांगलं काम करत आहे. सर्वेक्षणातील माहितीनुसार भारतात सरकारी सुविधांसाठी ४६ टक्के लोक हे वैयक्तिक ओखळीचा वापर करतात. यातील ३२ टक्के लोकांनी लाच दिली नाही तर कामच होत नाही, असं म्हटलं आहे. 

शेजारी देशांमध्ये परिस्थिती काय?भारतानंतर सर्वाधिक लाचखोरी केली जाणाऱ्या यादीमध्ये कंबोडियाचा दुसरा क्रमांक लागतो. यात ३७ टक्के लोक लाच देतात. तर ३० टक्क्यांसह इंडोनेशिया तिसऱ्या स्थानावर आहे. मालदीव आणि जापानमध्ये लाचखोरीचा दर संपूर्ण आशियात सर्वात कमी आहे. या देशांमध्ये केवळ २ टक्के लोक लाच देण्यासाठीची तयारी दर्शविली. विशेष म्हणजे, ट्रान्फरन्सी इंटरनॅशनलने या सर्वेक्षणात पाकिस्तानचा समावेश केलेला नाही. बांगलादेशमध्ये लाचखोरीचा दर भारतापेक्षा कमी २४ टक्के इतका आहे. तर श्रीलंकेत हाच दर १६ टक्के इतका आहे. 

सरकारी भ्रष्टारामुळे सर्वात जास्त त्रासट्रान्फरन्सी इंटरनॅशनलने १७ देशांमधील २० हजार लोकांना काही प्रश्न विचारले. हे सर्वेक्षण जून ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये घेण्यात आले होते. सर्वेक्षणात सरकारी सेवा देणाऱ्या ६ क्षेत्रांचा समावेश केला गेला होता. सरकारी सेवांमधील भ्रष्टाचारामुळे सर्वाधिक त्रासाला सामोरे जावे लागते असे सर्वेक्षणात दर ४ लोकांमागे तीन लोकांचे म्हणणे आहे. तर तीन लोकांमागे प्रत्येकी एक जण आपला लोकप्रतिनिधी भ्रष्ट असल्याचे मानतो.  

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणMONEYपैसाIndiaभारतJapanजपान