मोठी बातमी! भारतात येणाऱ्या सर्व प्रवाशांना RT-PCR चाचणी अहवाल निगेटिव्ह असणं अनिवार्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 08:02 PM2021-10-20T20:02:31+5:302021-10-20T20:03:37+5:30

Negative RT-PCR Report: भारतात येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणीचा (RT-PCR)अहवाल निगेटिव्ह असणं आता अनिवार्य करण्यात आलं आहे.

India Issues Fresh Travel Advisory Makes Negative RT PCR Test Report Must International Passengers | मोठी बातमी! भारतात येणाऱ्या सर्व प्रवाशांना RT-PCR चाचणी अहवाल निगेटिव्ह असणं अनिवार्य

मोठी बातमी! भारतात येणाऱ्या सर्व प्रवाशांना RT-PCR चाचणी अहवाल निगेटिव्ह असणं अनिवार्य

Next

Negative RT-PCR Report: भारतात येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणीचा (RT-PCR)अहवाल निगेटिव्ह असणं आता अनिवार्य करण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून बुधवारी यासंदर्भातील नवीन गाइडलाइन्स (India Issues Fresh Travel Advisory) जारी करण्यात आल्या आहेत. यानुसार भारतात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचा ७२ तासांपूर्वीचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह असणं बंधनकारक असणार आहे. सर्व प्रवाशांना आपल्या कोरोना चाचणीच्या अहवालाची प्रत सादर करावी लागणार आहे. ब्रिटनसह जगातील बहुतांश देशांमध्ये सध्या कोरोना महामारीच्या डेल्टा व्हेरिअंटनं धुमाकूळ घातला आहे. ब्रिटनमध्ये ११ ऑक्टोबरनंतर दैनंदिन पातळीवर ४० हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळत आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतानं आंतरराष्ट्रीय प्रवासाबाबत नियमांमध्ये पुन्हा कडक नियम लागू केले आहेत. 

भारतात ११ ते १७ ऑक्टोबर दरम्यान कोरोनाच्या दैनंदिन आकडेवारीत १८ टक्के आणि संक्रमणामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण १३ टक्क्यांनी कमी झालं आहे, अशी माहिती खुद्द जागतिक आरोग्य संघटनेनच (WHO) दिली आहे. युरोप वगळता इतर अनेक ठिकाणी दर आठवड्यात समोर येणाऱ्या आकडेवारीत घट पाहायला मिळत असल्याचंही नमदू करण्यात आलं आहे. 

युरोपात ७ टक्के रुग्णवाढीची नोंद
११ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत कोरोनाचे एकूण २७ लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ४६ हजारांहून अधिक जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. युरोपात गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कोरोना रुग्णसंख्येत तब्बल ७ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. 

भारतात कोरोनाचा प्रभाव हळूहळू कमी होताना दिसत आहे. यासोबत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचेही कोणतेही संकेत दिसून आलेले नाहीत. पहिल्या दोन लाटेंच्या अभ्यासानंतर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. पण तीही शक्यता आता कमी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार देशातील कोरोना आकडेवारीत सातत्यानं घट दिसून येत आहे. 

Web Title: India Issues Fresh Travel Advisory Makes Negative RT PCR Test Report Must International Passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.