शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पुढील प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे डोनाल्ड ट्रम्प?; मोदी सरकारकडून आमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 07:38 IST

भारताच्या आमंत्रणावर अमेरिकन प्रशासनाकडून सकारात्मक विचार सुरू

नवी दिल्ली: पुढील वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहू शकतात. यासाठी मोदी सरकारकडून ट्रम्प यांना आमंत्रण देण्यात आलं आहे. भारताच्या आमंत्रणाचा अद्याप अमेरिकन सरकारनं स्वीकार केलेला नाही. मात्र ट्रम्प प्रशासन या आमंत्रणाबद्दल सकारात्मक विचार करत असल्याची माहिती मिळत आहे. इंग्रजी वृत्तपत्र 'टाईम्स ऑफ इंडिया'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर वारंवार टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिल्यास मोदी सरकारचा तो मोठा विजय असेल. भारताच्या आमंत्रणावर अमेरिकेनं प्रशासनानं अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. ट्रम्प प्रशासनाकडून भारताच्या आमंत्रणाचा सकारात्मक विचार सुरू आहे. दोन्ही देशांमध्ये राजनैतिक चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यावर भारताकडून ट्रम्प यांना आमंत्रण पाठवण्यात आलं. याआधी 2015 च्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ट्रम्प यांनी भारताच्या आमंत्रणाचा स्वीकार केल्यास, त्यांची भारत भेट अनेकार्थांनी महत्त्वपूर्ण असेल. जगभरातील सर्व देश ट्रम्प यांच्यासोबत सलोख्याचे संबंध ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ट्रम्प यांच्या विक्षिप्त स्वभावामुळे अमेरिकेसोबत चांगले संबंध ठेवणं इतर सर्वच देशांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. भारत आणि अमेरिकेचे संबंध सुधारण्याचं आव्हान मोदी सरकारसमोर आहे. व्यापार शुल्क, इराणसोबत भारताचे ऐतिहासिक संबंध आणि उर्जा करार यांच्या पार्श्वभूमीवर भारतानं ट्रम्प यांना प्रजासत्ताक दिनाचं आमंत्रण दिलं आहे. याशिवाय भारतानं रशियासोबत एस-400 क्षेपणास्त्रांसाठी करार केला आहे. त्यामुळेदेखील भारत आणि अमेरिकेचे संबंध ताणले गेले आहेत.  

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा