शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिका-इराण तणावात भारताला लागली लॉटरी, चीन-पाकसह सर्वांनाच लागेल मिर्ची!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 21:57 IST

आरबीआयच्या आकडेवारीनुसार, या वाढीत परकीय चलन मालमत्तेचा (FCA) वाटा मोठा आहे, जी ३.५५ अब्ज डॉलर्सनी वाढून ५७३.६० अब्ज डॉलर्स झाली आहे. त्याचबरोबर, भारताच्या सोन्याच्या साठ्यातही (Gold Reserve) मोठी वाढ झाली आहे. त्याचे मूल्य ४.९९ अब्ज डॉलर्सनी वाढून १२८.४६ अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे. 

अमेरिका-इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर बाजारपेठेत अस्थिरता दिसत असतानाच, भारताला दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. देशाचा विदेशी मुद्रा साठ्यात आणि परकीय चलन मालमत्तेत आणि भारताच्या सोन्याच्या साठ्यातही (Gold Reserve) मोठी वाढ झाली आहे.

विदेशी मुद्रा साठ्यात वाढ -भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, १३ फेब्रुवारीला संपलेल्या आठवड्यात देशाचा विदेशी मुद्रा साठा ८.६६ अब्ज डॉलर्सनी वाढून ७२५.७२ अब्ज डॉलर्सच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला आहे.

विदेशी चलन आणि सुवर्ण साठ्यात जबरदस्त वाढ - आरबीआयच्या आकडेवारीनुसार, या वाढीत परकीय चलन मालमत्तेचा (FCA) वाटा मोठा आहे, जी ३.५५ अब्ज डॉलर्सनी वाढून ५७३.६० अब्ज डॉलर्स झाली आहे. त्याचबरोबर, भारताच्या सोन्याच्या साठ्यातही (Gold Reserve) मोठी वाढ झाली आहे. त्याचे मूल्य ४.९९ अब्ज डॉलर्सनी वाढून १२८.४६ अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे. 

विशेष रेखांकन अधिकार (SDR) १०.३ कोटी डॉलरने वाढून १८.९२ अब्ज डॉलर झाला आहे. महत्वाचे म्हणजे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतील (IMF) भारताच्या राखीव निधीतही वाढ नोंदवण्यात आली आहे. जो १.९ कोटी डॉलरने वाढून 4.734 अब्ज डॉलर झाला आहे.

...पण रुपया ९१ च्या जवळ -चलनांच्या बाजारात भारतीय रुपयाची घसरण सुरूच आहे. शुक्रवारी रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ३१ पैशांनी घसरून ९०.९९ (तात्पुरता) या पातळीवर बंद झाला. व्यवहारादरम्यान रुपयाने ९१.०४ चा निचांक गाठला होता. महत्वाचे म्हणजे, शेअर बाजारातील तेजी देखील रुपयाला सावरण्यास अपयशी ठरली. 

विश्लेषकांच्या मते, देशांतर्गत शेअर बाजारातील तेजी देखील रुपयाला आधार देऊ शकली नाही. अमेरिका आणि इराण याच्या वाढत्या तणावामुळे आणि युद्धाच्या शक्यतेमुळे गुंतवणूकदारांच्या मनात भीतीचे वातावरण आहे, याचा थेट परिणाम रुपयाच्या मूल्यावर झाला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : India Gains Amid US-Iran Tension; China, Pakistan Face Challenges

Web Summary : Rising US-Iran tensions boost India's foreign reserves to record highs. Gold reserves also surged. However, the rupee weakened, nearing 91 against the dollar, impacted by global uncertainty despite stock market gains.
टॅग्स :IndiaभारतAmericaअमेरिकाIranइराणEconomyअर्थव्यवस्था