नवी दिल्ली- भारत आणि अमेरिकेदरम्यान गुरुवारी पहिली 2+2 द्विपक्षीय बैठक झाली. यादरम्यान दोन्ही देशांत संरक्षण, व्यापारसह अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीमध्ये संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो, संरक्षण मंत्री जेम्स पॅटिस यांच्याशी बातचीत केली आहे. दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी बैठकीदरम्यान Communications Compatibility and Security Agreement (COMCASA) करारावर स्वाक्ष-या केल्या आहेत. या करारांतर्गत भारताला अमेरिका अत्याधुनिक तंत्रज्ञान देणार आहे. त्यामुळे भारताला त्याचा मोठा फायदा होणार आहे. तसेच दोन्ही देश आता नव्या हॉटलाइन नंबरनेही जोडले जाणार आहेत. विशेष म्हणजे ही हॉटलाइन चर्चा संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्र्यांच्या स्तरावरची असणार आहे.
दहशतवाद्यांविरोधातील अमेरिकेच्या कारवाईनं भारत खूश, सुषमांनी सुनावले पाकला खडे बोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 18:42 IST