शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा GDP 4 ट्रिलियन डॉलर्स पार; काँग्रेस म्हणते- 'भाजपने खोट्या बातम्या पेरल्या'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 19:37 IST

4 Trillion Dollar Economy: भारताचा जीडीपी 4 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेल्याचा दावा अनेक भाजप नेत्यांनी केला आहे.

4 Trillion Dollar Economy: काल माध्यमांमध्ये एक बातमी व्हायरल झाली, ज्यात भारताच्या जीडीपीने $ 4 ट्रिलियनचा टप्पा ओलांडल्याचा दावा करण्यात येत आहे. पण, केंद्र सरकार आणि त्यांच्या मंत्र्यांचा दावा खोटा असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. सोमवारी(20 नोव्हेंबर) सत्ताधारी भाजपवर ताशेरे ओढत काँग्रेसने आरोप केला की, फक्त खळबळ माजवण्यासाठी या खोट्या बातम्या पसरवण्यात आल्या.

 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एका पोस्टमध्ये काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, काल रविवारी (19 नोव्हेंबर) दुपारी 2.45 ते 6.45 दरम्यान संपूर्ण देश क्रिकेटच्या अंतिम सामन्याचा आनंद घेत होता. यावेळी, राजस्थान आणि तेलंगणातील वरिष्ठ केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवडते उद्योगपती यांच्यासह मोदी सरकारमधील अनेक बड्या नेत्यांनी एक ट्विट केले. त्यात भारताचा जीडीपी 4 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेल्याचे सांगण्यात आले' हे वृत्त पूर्णपणे खोटे आहे, हा फक्त खळबळ माजवण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका त्यांनी केली. 

नवा भारत प्रगती करतोय - देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दावा केला होता की, भारताच्या अर्थव्यवस्थेने 4 ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. यावरून मोदी सरकारची गतिमानता आणि दूरदर्शी नेतृत्व दिसून येते. नवा भारत अतिशय सुंदरपणे प्रगती करत आहे, असे ते म्हणाले होते.

भारतासाठी अभिमानाचा क्षण – गजेंद्र सिंह शेखावतकेंद्रीय मंत्री शेखावत म्हणाले होते की, भारतासाठी हा अभिमानाचा क्षण आहे, कारण आपला जीडीपी 4 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नव्या भारताचा उदय खरोखरच अनोखा आहे.

5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वाटचाल - जी किशन रेड्डी

याला मोदींची हमी म्हणत कॅबिनेट मंत्री जी किशन रेड्डी यांनी लिहिले की, आम्ही 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. दोन वर्षांत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल - गौतम अदानी

X वर स्क्रीनशॉट शेअर करताना गौतम अदानी यांनी लिहिले, अभिनंदन भारत, फक्त दोन वर्षात आपण जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू. आम्ही जपानची 4.4 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था आणि जर्मनीची 4.3 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था मागे टाकू. तिरंगा फडकतच राहील, जय हिंद.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस