शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! देशात 4 महिन्यांनंतर एका दिवसांत कोरोनाचे 700 रुग्ण, महाराष्ट्रासह 6 राज्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 20:33 IST

India Covid-19 Cases: केंद्र सरकारने दिला सावधानतेचा इशारा अन् महत्त्वाचा सल्ला

Covid Cases in India: भारतात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार होत आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. सुमारे चार महिन्यांनंतर, भारतात 700 हून अधिक नवीन प्रकरणे एकाच दिवसात नोंदवली गेली आहेत. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 754 नवीन रुग्ण आढळले आहेत. याची काळजी घेत केंद्र सरकारच्या आरोग्य सचिवांनी सहा राज्यांना पत्र लिहिले आहे.

पत्रात म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांत कोविडच्या प्रकरणांमध्ये घट झाली होती, परंतु गेल्या एक आठवड्यापासून प्रकरणांमध्ये अचानक वाढ होत आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारांनी कोरोनाच्या वाढत्या रुग्णांवर नियंत्रण ठेवण्याकडे लक्ष दिले पाहिजे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी ज्या सहा राज्यांना पत्र लिहिले आहे त्यात महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक यांचा समावेश आहे. आरोग्य सचिवांनी पत्रात म्हटले आहे की 15 मार्चपर्यंत प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे. राज्य सरकारांनी चाचणी, उपचार, ट्रॅक, लसीकरण यावर भर दिला पाहिजे.

केंद्राकडून राज्यांना खबरदारी घेण्याचा सल्ला

केंद्रीय आरोग्य सचिवांनी या राज्यांचे मुख्य सचिव, प्रधान सचिव यांना पत्र लिहून आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. यासोबतच या प्रकरणावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, कोरोना चाचणी करणे, कोरोनाच्या प्रकरणावर सतत लक्ष ठेवणे, नवीन फ्लू, विषाणू किंवा इन्फ्लूएंझा यांचे निरीक्षण करणे, जीनोमिक सिंड्रोम चाचणी करणे आणि कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

भारतात एका दिवसात कोरोनाचे 754 नवे रुग्ण

754 नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर देशात कोरोना बाधितांची संख्या 4,46,92,710 झाली आहे. त्याच वेळी, सक्रिय रुग्णांची संख्या 4,623 वर पोहोचली आहे. गेल्या वर्षी 12 नोव्हेंबर रोजी देशात दररोज 734 संसर्गाची प्रकरणे समोर आली होती. कर्नाटकमध्ये संसर्गामुळे एका रुग्णाच्या मृत्यूनंतर देशातील मृतांची संख्या 5,30,790 वर पोहोचली आहे.

कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के

आकडेवारीनुसार, भारतात आतापर्यंत एकूण 4,41,57,297 लोक कोरोनापासून बरे झाले आहेत, तर कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के आहे. रुग्णांच्या बरे होण्याचा राष्ट्रीय दर 98.80 टक्के आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशात देशभरात लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 220.64 कोटी अँटी-कोविड-19 लसींचे डोस देण्यात आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्रHealthआरोग्य