Vande Bharat: देशाला पहिली 'वंदे भारत स्लीपर' भेट; विमानासारख्या सुविधा, पण भाडे किती? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 17:47 IST2026-01-17T16:06:10+5:302026-01-17T17:47:16+5:30

Vande Bharat Sleeper Train: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हावडा ते गुवाहाटी दरम्यान धावणाऱ्या देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. आता रेल्वेचा प्रवास केवळ वेगवान नाही, तर विमानासारखा लक्झरी होणार आहे.

India First Vande Bharat Sleeper Train Flagged Off: Howrah to Guwahati in 14 Hours with Luxury Amenities | Vande Bharat: देशाला पहिली 'वंदे भारत स्लीपर' भेट; विमानासारख्या सुविधा, पण भाडे किती? वाचा

Vande Bharat: देशाला पहिली 'वंदे भारत स्लीपर' भेट; विमानासारख्या सुविधा, पण भाडे किती? वाचा

भारतीय रेल्वेच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्णअक्षरांनी लिहिला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. ही ट्रेन पश्चिम बंगालमधील हावडा आणि आसाममधील गुवाहाटी या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणार असून, यामुळे ईशान्य आणि पूर्व भारतामधील कनेक्टिव्हिटी, पर्यटन आणि व्यापाराला मोठी चालना मिळणार आहे.

ही पूर्णपणे वातानुकूलित १६ डब्यांची ट्रेन असून तिची एकूण क्षमता ८२३ प्रवाशांची आहे. सध्या हावडा ते गुवाहाटी दरम्यान धावणाऱ्या इतर गाड्यांच्या तुलनेत वंदे भारत स्लीपर अंदाजे ९५८-९६८ किलोमीटरचे अंतर केवळ १४ तासांत पूर्ण करेल. यामुळे प्रवाशांचा सुमारे अडीच ते तीन तासांचा वेळ वाचणार आहे. ही ट्रेन ताशी १८० किमी इतक्या प्रचंड वेगाने धावली.

प्रवाशांच्या आरामासाठी या ट्रेनमध्ये अत्याधुनिक सस्पेंशन सिस्टम, स्वयंचलित दरवाजे आणि सुधारित बर्थ देण्यात आले. विशेष म्हणजे, प्रवासादरम्यान प्रवाशांना बंगाली आणि आसामी अशा प्रादेशिक पाककृतींचा आस्वाद घेता येणार आहे. ही ट्रेन आठवड्यातून सहा दिवस धावेल. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एसी १, एसी २ आणि एसी ३ या ट्रेनच्या तिन्ही वर्गांसाठी तात्पुरते भाडे जाहीर केले आहे. रेल्वे बोर्डाच्या नियमानुसार, किमान ४०० किलोमीटर अंतरासाठी भाडे आकारले जाईल.

४०० किमी पर्यंतचे किमान भाडे:

एसी १: १ हजार ५२० रुपये
एसी २: १ हजार २४० रुपये
एसी ३: ९६० रुपये

रेल्वेच्या नियमांत बदल

वंदे भारत स्लीपर ट्रेनसाठी रेल्वे बोर्डाने काही कडक नियम लागू केले आहेत: १. फक्त कन्फर्म तिकिटे: या ट्रेनमध्ये आरएसी (RAC) किंवा प्रतीक्षा यादीतील (Waiting List) प्रवाशांना प्रवासाची परवानगी नसेल. फक्त पूर्णपणे पुष्टी झालेली (Confirmed) तिकिटेच जारी केली जातील. २. आरक्षण कोटा: या ट्रेनमध्ये इतर कोणताही सामान्य कोटा लागू नसेल. केवळ महिला, दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि ड्युटी पास धारकांसाठीच आरक्षणाची तरतूद असेल.

Web Title : पहली वंदे भारत स्लीपर ट्रेन शुरू: विशेषताएँ और किराया

Web Summary : पीएम मोदी ने हावड़ा और गुवाहाटी को जोड़ने वाली पहली वंदे भारत स्लीपर ट्रेन का शुभारंभ किया। यह पूर्णतः वातानुकूलित ट्रेन यात्रा के समय को 2.5-3 घंटे कम करती है। इसमें आधुनिक सुविधाएं और क्षेत्रीय भोजन उपलब्ध हैं। 400 किमी के लिए एसी 3 का किराया ₹960 से शुरू होता है।

Web Title : India's First Vande Bharat Sleeper Train Launched: Features & Fares

Web Summary : India's first Vande Bharat sleeper train, connecting Howrah and Guwahati, was launched by PM Modi. The fully AC train reduces travel time by 2.5-3 hours. It features modern amenities and regional cuisine. Fares start at ₹960 for AC 3 for 400 km.