शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

जे मिसाइल बनवण्यात अमेरिकाही फेल झाली, तशी भारतानं 3-3 बनवली; पाकिस्तान-चीनचं टेन्शन वाढलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 15:36 IST

याचे संपूर्ण श्रेय जाते ते, भारतीय शास्त्रज्ञांच्या जिद्दीला आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) मेहनतीला.

जगातील महासत्ता म्हणवली जाणारी महाशक्तीशाली अमेरिकाही आज हायपरसोनिक मिसाइल तयार करण्यासाठी धडपडत आहे. मात्र कधीकाळी तांत्रिक क्षमतेत जगाच्या स्पर्धेत पिछाडीवर समजल्या जाणाऱ्या भारताने आज 3-3 महामिसाइल्स तयार करून संपूर्ण जगाला अचंबित केले आहे. आज तांत्रिक क्षमतेच्या  बाबतीत भारताची गणना जगातील अग्रणी देशांमध्ये होते. याचे संपूर्ण श्रेय जाते ते, भारतीय शास्त्रज्ञांच्या जिद्दीला आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) मेहनतीला. डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी प्रोजेक्ट ध्वनीअंतर्गत शक्तीशाली हायपरसोनिक शस्त्रे तयार केली आहेत. 

ध्वनीच्या वेगापेक्षा वेगवान असतात हायपरसोनिक मिसाइल -खरे तर, हायपरसोनिक मिसाइल्स ही अशी मिसाइल्स असतात जी ध्वनीच्या वेगापेक्षा 5 पट वेगाने, म्हणजेच ताशी 6,200 किलोमीटर वेगाने उड्डाण करून आपल्या लक्ष्याला लक्ष्य करू शकतात. ही मिसाइल्स त्यांचा वेग आणि कमी उंचीवर उडण्याच्या त्यांच्या वैशिष्ट्यांमुळेही अत्यंत घातक बनतात, ज्यांना कुठलेही रडार पकडू शकत नाही. डीआरडीओचे हे हायपरसोनिक तंत्रज्ञान पूर्णपणे स्वदेशी आहे. महत्वाचे म्हणजे, हे हायपरसोनिक मिसाईल रॉकेट इंजिनद्वारेही लॉन्च होते आणि वातावरणात 6 ते 7 Mach वेगाने उडते. या शिवाय, ते 1,500 किलोमीटरपेक्षाही अधिकच्या रेंजमध्ये पेलोड वाहून नेण्यासही सक्षम आहे.

भारताच्या तिनही सेनांसाठी अत्यंत उपयोगी -ध्वनीच्या वेगापेक्षाही 5 पट वेगाने उड्डाण करण्याची आणि कुठलेही रडार पकडू शकत नसल्याची खासियत असलेले हे हायपरसोनिक मिसाईल भारताच्या तिन्ही सैन्य दलासाठीसाठी (भूदल, नौदल आणि हवाई दल) उपयुक्त आहे. यामध्ये मिसाइलमध्ये स्क्रॅमजेट इंजिनचा वापर करण्यात आला आहे. जे उड्डाणावेळी मिसाइलचा वेग कायम ठेवते. भारताचे ब्रह्मोस-2 हे या हायपरसॉनिक तंत्रज्ञानाचे उत्तम उदाहरण आहे. सध्या DRDO तीन वेगवेगळ्या डिझाइन्सवर काम करत आहे.

पाकिस्तान चीनची खैर नाही - एकदा भारताकडून चुकून पाकिस्तानच्या दिशेने एक ब्रह्मोस मिसाइल डागले गेले होते. जे पाकिस्तान ट्रॅक करू शकला नव्हता. मात्र, आता ब्रह्मोस-2 आणि प्रोजेक्ट ध्वनीच्या हायपरसोनिक मिसाइल्ससमोर पाकिस्तानच काय पण चीन आणि अमेरिकन डिफेंस सिस्टिमही पूर्णपणे हतबल दिसत आहे. जेथे अमेरिकेला आपला हायपरसॉनिक कार्यक्रम आजवर यशस्वी करता आला नाही, तेथे भारताने रशियाच्या सोबतीने या तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवले आहे

टॅग्स :DRDOडीआरडीओDefenceसंरक्षण विभागIndiaभारतAmericaअमेरिकाchinaचीनPakistanपाकिस्तान