शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भारत रोखणार नद्यांचं पाणी; पाकिस्तानात निर्माण होणार पाणीबाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 19:31 IST

पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

नवी दिल्ली - पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, पाकिस्तानची सार्वत्रिक कोंडी करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास भारताने तयारी सुरू आहे. आता सिंधू जल करारातून माघार घेण्याच्या दिशेने भारताने पावले उचलली असून, त्यानुसार काश्मीर खोऱ्यातून पाकिस्तानकडे वाहत जाणाऱ्या नद्यांचे पाणी मोठी धरणे बांधून पूर्वेकडे वाहत येणाऱ्या नद्यांमध्ये वळवण्यात येणार आहे. त्याचा फायदा जम्मू काश्मीर आणि पंजाबसह इतर राज्यांना होणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला युद्धखोरीची धमकी दिलेली असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तोंडचे पाणी पळविण्याचा थेट इशाराच देऊन टाकला होता. पुलवामा आत्मघाती हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर गडकरी यांनी केलेले महत्वाचे मानले जात होते. दरम्यान, आज अखेरीस यासंदर्भातील घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासंर्भातील माहिती ट्विटरवरून दिली आहे.

केंद्र सरकारच्यावतीने सिंधू जल कराराविषयी माहिती देताना  गडकरींनी सांगितले की पाकिस्तानकडे वाहत जाणाऱ्या तीन नद्यांचे पाणी या नद्यांवर बांधण्यात येणाऱ्या धरणांमधून रोखण्यात येईल. त्यानंतर हे पाणी पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्ये वाहत येणाऱ्या नद्यांमध्ये प्रवाहित करण्यात येईल. 

उत्तर प्रदेशमधील बागपत येथील एका सभेमध्ये गडकरी यांनी पाकिस्तानला तोंडचे पाणी पळविण्याचा इशारा दिला होता. भारतातून वाहणाऱ्या तीन नद्यांचे पाणी पाकिस्तानला जाते. हे पाणी यमुना नदीला जोडू आणि पाकिस्तानला ओसाड बनविण्याची धमकीच त्यांनी दिली आहे. या तिन्ही नद्यांना जोडण्याच्या प्रकल्पावर काम सुरु आहे. याद्वारे जलवाहतुकही सुरु केली जाईल असे गडकरी यांनी सांगितले.

 

टॅग्स :IndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीरpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानWaterपाणीNitin Gadkariनितीन गडकरी