शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर भारत सरकारने खामेनेई यांना वाहिली श्रद्धांजली, इराणीत दूतावासात जाऊन व्यक्त केला शोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 18:15 IST

India Condoles Death Of Khamenei: गेल्या आठवड्याच्या अखेरीस अमेरिके आणि इस्राइलने सुरू केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला होता. अमारिका आणि इस्राईलने इराणविरुद्ध सुरू केलेल्या युद्धाच्या सुरुवातीलाच खामेनेई यांचा मृत्यू झाल्याने जगभरात खळबळ उडाली होती. मात्र आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या या संघर्षाबाबत भारताने मौन पाळले होते.

गेल्या आठवड्याच्या अखेरीस अमेरिके आणि इस्राइलने सुरू केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला होता. अमारिका आणि इस्राईलने इराणविरुद्ध सुरू केलेल्या युद्धाच्या सुरुवातीलाच खामेनेई यांचा मृत्यू झाल्याने जगभरात खळबळ उडाली होती. मात्र आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या या संघर्षाबाबत भारताने मौन पाळले होते. तसेच खामेनेई यांच्या मृत्यूनंतर औपचारिकरीत्या श्रद्धांजली वाहणे किंवा इतर प्रतिक्रिया देणे टाळले होते. मात्र आता भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी नवी दिल्लीतील इराणच्या दूतावासात जात खामेनेई यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी आज नवी दिल्ली येथील इराणी दूतावासाला भेट दिली. यावेळी मिसरी यांनी इराणी दूतावासामधील शोक पुस्तिकेवर शोकसंदेश लिहून आणि स्वाक्षरी करून अयातुल्लाह अली खामेनेई यांना श्रद्धांजली वाहिली. मिसरी यांनी ही स्वाक्षरी भारत सरकारच्यावतीने केली. तसेच इराणबाबत आपली संवेदना आणि एकजुटता व्यक्त केली.

अयातु्ल्लाह अली खामेनेई हे १९८९ पासूनन इराणच्या सर्वोच्च नेतेपदी होते. दरम्यान, २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्राइलने केलेल्या हवाई हल्ल्यात अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला होता. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर आखातामध्ये तीव्र संघर्षाचा भडका उडाला असून, सर्वोच्च नेत्याच्या मृत्युमुळे चवताळलेल्या इराणकडून आखाती देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांसह इस्राइलवर जोरदार हल्ले सुरू आहेत.  

English
हिंदी सारांश
Web Title : India Pays Tribute to Khamenei After Initial Silence, Expresses Condolences

Web Summary : After initial silence, India's Foreign Secretary Vikram Misri paid tribute to Iran's Supreme Leader Ayatollah Ali Khamenei at the Iranian embassy in New Delhi. This gesture signifies India's condolences and solidarity with Iran amidst regional conflict following Khamenei's death in alleged US-Israeli strikes.
टॅग्स :IndiaभारतIranइराणInternationalआंतरराष्ट्रीय