शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लडाखजवळ चिनी लढाऊ विमानाची घुसखोरी, ड्रॅगनची पुन्हा कुरापत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 09:11 IST

चीनच्या वायुसेनेच्या लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ कुरापती सुरूच आहेत.

चीनच्या वायुसेनेच्या लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ कुरापती सुरूच आहेत. चिनी वायुसेनेचा लडाखजवळ सराव सुरू आहे. त्यावेळी एक विमान पूर्व लडाखमध्ये भारतीय वायुसेनेच्या रडारवर आले हाेते. त्या ठिकाणापासून अतिशय जवळच भारतीय जवान तैनात आहेत. त्यानंतर भारतीय वायुसेनेने तातडीने कारवाई करण्याची तयारी केली हाेती. कारवाईचा इशारा दिल्यानंतर चिनी विमान परतले. मात्र, भारताने या घटनेबाबत चीनकडे तीव्र आक्षेप नाेंदविला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात हा प्रकार घडला हाेता. चिनी वायुसेनेकडून सरावादरम्यान हवाई सुरक्षेसंबंधी शस्त्रास्त्रांचा वापर करण्यात येत आहे. त्यादरम्यान, एक विमान भारतीय सीमेच्या अतिशय जवळ आले हाेते. ते रडारवर येताच भारतीय वायुसेना अलर्ट झाली. सीमेजवळ माेठ्या प्रमाणात भारतीय सैनिक तैनात आहेत. त्यांच्या पाेझिशन्सपासून चिनी विमान खूप जवळ पाेहाेचले हाेते. हा प्रकार घुसखाेरीचा असल्याचे ठरवून वायुसेनेने  कारवाईची तयारी केली हाेती. गलवानच्या खाेऱ्यात २०२०मध्ये झालेल्या संघर्षानंतर लडाखच्या सीमेवर दाेन्ही देशांचे ५० हजारांहून  अधिक सैनिक तैनात आहेत. 

ड्रॅगनला सज्जड दमभारताने चिनी अधिकाऱ्यांसमाेर हा मुद्दा उपस्थित करून असे प्रकार हाेऊ नयेत, याबाबत सज्जड दम दिला आहे. त्यानंतर ड्रॅगनने एक पाऊल मागे घेतले असून, सीमेजवळ पुन्हा असा प्रकार घडलेला नाही. 

टॅग्स :Indiaभारतchinaचीनladakhलडाख