शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

India China Faceoff : लष्कराला 'इमर्जन्सी पॉवर्स'; चीनला जशास तसं प्रत्युत्तर देण्यासाठी सरकारकडून 'फ्री-हँड'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 18:05 IST

India Chine Faceoff : चीनच्या आक्रमक कारवाईला जशास तसे उत्तर देण्यासाठी मोदी सरकारनंही लष्कराला सर्वाधिकार बहाल केले आहेत. 

नवी दिल्लीः लडाखच्या गलवान खोऱ्यात LACवर भारत-चीन सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाले. तर चीनच्या ४३ सैनिकांना ठार करण्यात आलेलं आहे. त्यानंतर चीनच्या आक्रमक कारवाईला जशास तसे उत्तर देण्यासाठी मोदी सरकारनंही लष्कराला सर्वाधिकार बहाल केले आहेत. वास्तविक नियंत्रण रेषेत (एलएसी) कोणत्याही चिनी आक्रमणाविरोधात लढण्यासाठी भारतीय सैन्याला पूर्ण स्वातंत्र्याचे आपत्कालीन अधिकार देण्यात आले आहेत. सोमवारी रात्री झालेल्या हिंसक संघर्षानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे.ज्या ठिकाणी संघर्ष झाला, त्या गलवान खोऱ्यात भारतीय लष्कराला चीनविरोधातील कारवाईसाठी मोकळीक देण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे याच भागात चीनच्या पीएलएनं युद्धसराव केला आहे. भारतीय लष्कर आणि चिनी सैन्य गेल्या महिन्याभरापासून लडाखच्या सीमेवर एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत. चीन वारंवार भारताच्या भूमीत घुसखोरी करत असून, भारतीय जवानही त्याला वेळोवेळी रोखत असल्यानं चकमक उडत आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही चीनला जशास तसे उत्तर देण्यात आम्ही सक्षम असल्याचं व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सांगितलं होतं. 

आम्ही कधीच कोणाला उकसवलं नाही. तसेच आम्ही देशाची अखंडता आणि सार्वभौमत्वाशी कोणतीही तडजोड करणार नाही. जेव्हा कधी वेळ आली तेव्हा आम्ही देशाची अखंडता आणि सार्वभौमत्वाचं संरक्षण करण्यासाठी शक्तीचं प्रदर्शन केलं आहे. आपले जवान मारता मारता शहीद झाले आहेत याचा देशाला अभिमान आहे. आमच्या क्षमता वेळोवेळी आम्ही सिद्ध केलेल्या आहेत. आमच्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. भारताची अखंडता आणि सार्वभौमत्वाशी कोणालाही छेडछाड करू देणार नाही, यासंदर्भात कोणालाही संभ्रम असण्याचं कारण नाही. भारताला शांती हवी आहे. पण जर भारताला संघर्षासाठी उकसवल्यास चोख प्रत्युत्तर देण्यात सक्षम आहे, असंही मोदींनी चीनला ठणकावलं आहे. 

हेही वाचा

India China Faceoff: भारत-चीन सैन्यातील हिंसक झटापटीनंतर पंतप्रधान मोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

India China Faceoff: मोदीजी बाहेर या, कुठे लपून बसला आहात?, राहुल गांधींचा हल्लाबोल

CoronaVirus News : आरोग्य कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन द्या, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

CoronaVirus News: "अखेर सत्य पुढे आलेच"; कोरोनाबळींचा आकडा वाढला, फडणवीसांनी सरकारवर निशाणा साधला!

टॅग्स :chinaचीनIndian Armyभारतीय जवान