शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भारत-चीन मैत्री ही जगाची गरज -मिंग शियांगफंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 05:32 IST

भारत आणि चीन यांच्यातील नाते सुदृढ, स्थिर आणि विश्वासाचे असणे हे फक्त या दोन्ही देशांसाठीच नव्हे, तर दक्षिण आशियाच्या समृद्धतेसाठी आणि मानवी समाजाच्या भल्यासाठीही आवश्यक आहे, असे मत

मुंबई - भारत आणि चीन यांच्यातील नाते सुदृढ, स्थिर आणि विश्वासाचे असणे हे फक्त या दोन्ही देशांसाठीच नव्हे, तर दक्षिण आशियाच्या समृद्धतेसाठी आणि मानवी समाजाच्या भल्यासाठीही आवश्यक आहे, असे मत चीनच्या सत्ताधारी चायनीज कम्युनिस्ट पार्टी (सीपीसी)चे सदस्य मिंग शियांगफंग यांनी व्यक्त केले.गेल्या वर्षी आॅक्टोबर महिन्यात बीजिंग येथे झालेली ‘सीपीसीची नॅशनल कॉन्फरन्स आणि त्याचे भारत-चीन संबंधावरील परिणाम’या विषयावर ते गुरुवारी मुंबईत बोलत होते. आॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन, मुंबई आणि चीनचा मुंबईतील दूतावास यांनी संयुक्तरीत्या आयोजित केलेल्या या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. या वेळी चीनचे मुंबईतील कौन्सिल जनरल झेन झियुआन, ओआरएफ मुंबईचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी यांच्यासह दोन्ही देशांतील विविध मान्यवर उपस्थित होते.भारत-चीन या दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यासाठी सर्वांत आधी परस्परांवरील राजकीय विश्वास आणि यूएन, ब्रिक्स, एससीओ अशा जागतिक व्यासपीठावरील सहकार्य याकडे लक्ष द्यायला हवे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शि जिनपिंग यांनी या दिशेने पाऊल उचलले असून, त्यात दोघांनाही फायदाच होईल, असा विश्वास मिंग यांनी व्यक्त केला. चीन ही जगाची फॅक्टरी असून आम्ही ‘मेड इन चायना २०२५’ ही योजना सुरू केली आहे. तर भारत हे जगाचे कार्यालय असून ते स्मार्ट सिटी आणि स्कील इंडियासारखे प्रकल्प घेऊन पुढे येत आहे.या साºया प्रयत्नांमध्ये सहकार्य, तंत्रज्ञानाची देवाणघेवाण, कल्पक योजना आणि गुंतवणूक यासाठी अमर्याद संधी उपलब्ध आहेत.पाश्चिमात्य देश नेतृत्वहीन होत चालले असतानाच, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे मात्र एक द्रष्टे आणि जागतिक दृष्टी असलेले परिपक्व नेतृत्व आहे, अशा शब्दांत ओआरएफ मुंबईचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी यांनी त्यांचा गौरव केला. चीनच्या बीआरआय प्रकल्पाबाबत भारताने समंजस भूमिका घेण्याची गरज अधोरेखित करताना, या प्रकल्पाद्वारे शेजारील देशांशी विशेषत: पाकिस्तानशी, सार्क देशांशी आणि अगदी चीनशीही संबंध सुधारण्याची संधी यात असल्याचेही कुलकर्णी यांनी नमूद केले.

 

टॅग्स :Indiaभारतchinaचीन