शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

India China FaceOff: भारत चीनवरील अवलंबित्व कमी करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 06:57 IST

येत्या नोव्हेंबरमध्ये त्याची अंमलबजावणी सुरू होईल. केंद्रीय मंत्री आर.के. सिंह यांच्या कार्यालयात त्यासाठी बैठकांचे सत्र सुरू आहे.

टेकचंद सोनवणे नवी दिल्ली : चीनला धडा शिकवण्यासाठी आर्थिक धोरणांमध्ये मोठे बदल करण्याची तयारी भारताने सुरू केली आहे. विशेषत: तंत्रज्ञान क्षेत्रात चिनी कंपन्यांवर कठोर निर्बंध घातले जातील. त्याची सुरुवात ५ जी सेवेचे कंत्राट चिनी हुवाए कंपनीकडून काढून घेण्यात झाली. सौर ऊर्जा उत्पादनांसाठी चीनवर असलेले अवलिंबत्वदेखील कमी केले जाईल. त्यासाठी स्वदेशी कंपन्यांना प्रोत्साहन दिले जाणार असल्याची माहिती केंद्रीय ऊर्जा मंत्रालयातील सूत्रांनी दिली. केंद्र व राज्य सरकारने कृषी सौर पंप योजना सुरू केल्याने मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात सौर ऊर्जेचा वापर वाढेल. अशावेळी चिनी कंपन्यांना याचा लाभ घेऊ न देण्यासाठी नवे सौर ऊर्जा धोरण आखण्यात येईल. येत्या नोव्हेंबरमध्ये त्याची अंमलबजावणी सुरू होईल. केंद्रीय मंत्री आर.के. सिंह यांच्या कार्यालयात त्यासाठी बैठकांचे सत्र सुरू आहे.दरम्यान, चीनने औषध निर्मितीसाठी आवश्यक घटकांच्या निर्यातीवर २० टक्के शुल्क वाढ केली. एकप्रकारे भारतावर दबाव टाकण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने प्रत्त्यूत्तरादाखल ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विकल्या जाणाऱ्या वस्तू, सीमेलगत असलेल्या देशांमधील गुंतवणूक, मेट्रो रेल्वे, हायस्पीड रेल्वेसाठी परदेशी कंपन्यांची सावध निवड करण्याची रणनिती आखली. गेल्या अनेक वर्षांपासून कन्फ्युशिअस इन्स्टिट्युट स्थापण्याची चीनची मागणी धुडकावली जाईल.>चर्चेसोबत युद्धाचीही तयारीयुद्ध सिद्धता करून भारताने लष्करी अधिकाऱ्यांसह आता राजनैतिक स्तरावरही चीनसमवेत चर्चेची तयारी दाखवली आहे. चर्चा सुरू असली तरी भारत आपल्या अटींवर ठाम आहे. गलवान खोºयावरील हक्क सांगण्याचा कांगावा कदापि मान्य होणार नसल्याचे संदेश भारताकडून दिले आहेत आहेत. चिनी ड्रॅगनला घेरण्यासाठी केवळ सीमेवरच नव्हे तर आर्थिक, सामरिक, आंतरराष्ट्रीय स्तरावर रणनिती भारताने आखली आहे. गलवान खोºयातील झटपटीनंतर स्वत:च्या सैनिकांच्या मृत्यूचा आकडा जगापासून लपवणाºया चिनी राज्यकर्त्यांपासून अजिबात गाफिल न राहण्याची भारताची रणनीती आहे.दोन्ही देशांमध्ये लष्करी अधिकाºयांसह लवकरच राजनैतिक चर्चाही सुरू होईल. त्यासंबंधीचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. भारताच्या कठोर भूमिकेमुळे संपूर्ण आशिया खंडात चीनच्या भू हव्यासाला मोठा दणका मिळाला.>आकडा लपवणे सुरूचबीजिंगमध्ये परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत दररोज गलवान खोºयावरून प्रवक्त्यांना प्रश्न विचारले जात आहेत. माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांच्या दाव्यानुसार चीनचे ४० सैनिक भारतीय जवानांसमवेतच्या झटापटीत मारले गेले. त्यावर झाओ लिजियान यांनी 'तशी माहिती नाही', असे सांगितले.भारत व चीन लष्कर तसेच राजनैतिक स्तरावरील सध्या चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. सरकारी निधीतून चालणाºया चिनी कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र ग्लोबल टाइम्सने झटापटीत पीएलएचे सैनिकही मारले गेल्याचे म्हटले होते. त्यावर चीनकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत