शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'जुना मित्र' येणार भारताच्या कामी; चिनी दबाव झुगारून भारताला 'ब्रह्मास्त्र' देण्याची हमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 11:05 IST

भारताला एस-४०० यंत्रणा लवकरात लवकर देण्याचं रशियाचं आश्वासन

ठळक मुद्देजगातील सर्वात आधुनिक हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र यंत्रणा भारताला लवकरच मिळणारभारताच्या आवाहनाला रशियाकडून सकारात्मक प्रतिसादचीनसोबतचे संबंध ताणले गेले असताना भारताची ताकद वाढणार

मॉस्‍को: दीड महिन्यांपासून लडाखमध्ये चीनसोबत निर्माण झालेला वाद, त्यानंतर गेल्याच आठवड्यात गलवानमध्ये झालेली झटापट यामुळे सीमेवरील तणाव वाढला आहे. भारत आणि चीननं सीमेवरील फौजफाटा वाढवला आहे. चीनच्या कोणत्याही आगळिकीला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज झालं आहे. सरकारनं लष्कराला फ्री हँड दिला आहे. त्यामुळे आता गोळीबार करण्याचे आदेश फिल्ड कमांडरकडून दिले जातील. सीमेवरील शस्त्रास्त्रं सज्जता वाढवण्याचे प्रयत्न करणाऱ्या भारताला रशियानं मोठा दिलासा दिला आहे.लडाख सीमेवरील तणाव वाढत असताना रशियानं भारताला एस-४०० लवकरात लवकर देण्याचं आश्वासन दिलं आहे. एस-४०० जगातील सर्वात आधुनिक हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र यंत्रणा आहे. चीनसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह रशियाच्या दौऱ्यावर आहेत. रशियाचे उपपंतप्रधान युरी इवानोविक बोरिसोव यांनी एस-४०० यंत्रणा लवकरात लवकर भारताला देण्यात येईल, असं आश्वासन दिलं आहे. रशियानं भारताला शस्त्रास्त्रं पुरवठा करू नये, असं आवाहन चिनी सरकारच्या पीपल्स डेली वृत्तपत्रानं केलं होतं. मात्र चीननं निर्माण केलेला दबाव रशियानं झुगारला आहे.भारतासोबत केलेले करार लवकरात लवकर पूर्ण केले जातील, असं आश्वासन रशियाकडून देण्यात आल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी उपपंतप्रधान युरी इवानोविक बोरिसोव यांच्यासोबतच्या बैठकीनंतर दिली. 'रशियाच्या उपपंतप्रधानांसोबतची चर्चा अतिशय सकारात्मक झाली. कोरोना संकट काळातही रशिया आणि भारतामधील दृढ संबंध कायम आहेत. आधी करण्यात आलेले करार कायम राहतील. याशिवाय काही नव्या गोष्टीही कमीत कमी कालावधीत पूर्ण केल्या जातील,' असं सिंह म्हणाले.भारत सरकारनं एस-४०० क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणा लवकर देण्याचा आग्रह केला होता. त्याला रशिया सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिला, असं वृत्त रशियन वृत्तपत्र स्पुटनिकनं दिलं आहे. जगातील सर्वात आधुनिक हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र यंत्रणा असलेल्या एस-४०० साठी भारतानं रशियासोबत २०१८ मध्ये करार केला. हा करार ४० हजार कोटी रुपयांचा आहे. भारताला एस-४०० यंत्रणेच्या चार युनिट्स मिळतील. याशिवाय भारत रशियाकडून ३१ लढाऊ विमानंदेखील खरेदी करणार आहे. टी-९० रनगाड्यांच्या सुट्ट्या भागांसाठी रशिया आणि भारतात चर्चा सुरू आहे.चीनच्या कारवायांची थक्क करणारी गती; भारताशी पंगा घेणाऱ्या नेपाळला सतावतेय वेगळीच भीतीभारत-चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये १२ तास बैठक; भारतानं स्पष्ट शब्दांत सुनावलंनाद करा, पण आमचा कुठं! भारतीय जवानांनी थेट चिनी अधिकाऱ्याला उचललंचीन युद्धाच्या तयारीत?; लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत हवाई दलाच्या हालचाली

टॅग्स :Indiaभारतchinaचीनrussiaरशिया