शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff: मोदींच्या वक्तव्यांवरून राजकीय वादंग, काँग्रेसने उपस्थित केले सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 02:39 IST

India China FaceOff: चीन विषयाचे तज्ज्ञ आणि राजकीय पक्ष आता मोदी यांच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत..

शीलेश शर्मानवी दिल्ली : लडाखमध्ये बाहेरील कोणत्याही व्यक्तीने घुसखोरी केलेली नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केल्यानंतर यावरून राजकीय वादंग निर्माण झाला आहे. चीन विषयाचे तज्ज्ञ आणि राजकीय पक्ष आता मोदी यांच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित करीत टष्ट्वीट केले आहे की, पंतप्रधान मोदी यांनी भारतीय हद्दीत चिनी अतिक्रमणासमोर समर्पण केले आहे. जर ती जमीन चीनची होती, तर आमचे सैनिक का शहीद झाले? ते कोणत्या ठिकाणी शहीद झाले?माजी गृहमंत्री चिदम्बरम यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान जे सांगतात ते खरे असले तरी ५-६ मे रोजी दोन्ही सैन्यांत संघर्ष का झाला? ५ मे ते ६ जूनपर्यंत भारतीय कमांडर चिनी कमांडरशी कोणत्या मुद्यांवर चर्चा करीत होते. जर चिनी सैन्य आपल्या हद्दीत घुसले नाही, तर परराष्ट्रमंत्री जयशंकर आणि परराष्ट्र मंत्रालयाने यथास्थिती ठेवण्याचे आवाहन का केले आहे? चिनी सैन्य मागे जात आहे, असे सरकारकडून सांगितले जात आहे. म्हणजे, ते आपल्याच सीमेवरून मागे जात आहे काय? दरम्यान, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही मोदी यांच्या वक्तव्यावर व्यंग केले आणि गोरख पांडे यांची कविता टष्ट्वीट केली ‘राजा बोला रात है, रानी बोली रात है, मंत्री बोला रात है, संत्री बोला रात है, यह सुबह सुबह की बात है.’>माजी परराष्ट्रमंत्री नटवर सिंह काय म्हणाले?माजी परराष्ट्रमंत्री नटवर सिंह यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, चिनी सैनिक गलवान खोऱ्यात ज्या ठिकाणापर्यंत घुसले आहेत ते आता ती जागा रिकामी करणार नाहीत. चीन ज्या जागेवर ताबा मिळवितो ती जागा ते पुन्हा रिकामी करीत नाहीत. अक्साई चीनवर चीनने याच प्रकारे ताबा मिळविला आहे. भारत आजपर्यंत ती जागा परत मिळवू शकलेला नाही. गलवान खोºयात झालेल्या घटनेनंतर भारताकडून जी रणनीती वापरण्यात आली आहे, ती पाहता असे म्हणता येईल की, यामुळे मोदी यांच्या परराष्ट्र धोरणाला मोठा धक्का बसला आहे. माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी म्हटले आहे की, मोदी सरकार ज्या प्रकारे दावे करीत आहे, त्यातून त्यांच्या परराष्ट्र धोरणाची जी समज आहे, त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मोदी यांनी चीनची मानसिकता समजून घ्यावी आणि नंतर कारवाई करावी.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी