शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

India China FaceOff: कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज, लष्करप्रमुख मनोज नरवणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 06:18 IST

या भागातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी नरवणे गुरुवारपासून लडाखच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. चीनने पेंगाँग सरोवराच्या परिसरात केलेला घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी उधळून लावला होता.

लेह : लडाखलगतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव काही प्रमाणात वाढला असला तरी कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास भारतीय लष्कर सज्ज आहे, असा इशारा लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी चीनचे नाव न घेता शुक्रवारी दिला. या भागातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी नरवणे गुरुवारपासून लडाखच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. चीनने पेंगाँग सरोवराच्या परिसरात केलेला घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी उधळून लावला होता. त्यानंतरही चीनकडून भारताच्या कुरापती काढण्याचे प्रकार सुरूच आहेत.मनोज नरवणे यांनी सांगितले की, भारतीय जवानांचे मनोबल उंचावलेले असून, ते कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास तयार आहेत. सीमेवरील स्थिती लक्षात घेता भारताने स्वत:च्या रक्षणासाठी योग्य उपाययोजना केलेल्या आहेत. देश सुरक्षित राहण्यासाठी व सार्वभौमत्व टिकविण्यासाठी हे पाऊल आवश्यक आहे. नरवणे म्हणाले की, भारतीय लष्करातील प्रत्येक जवान व अधिकारी हे उत्कृष्ट दर्जाचे आहेत. त्यांची कामगिरी केवळ लष्करासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशाकरिता गौरवास्पद ठरणार आहे. लष्करप्रमुख मनोज नरवणे म्हणाले की, लडाखमधील लेह या शहरात पोहोचल्यानंतर मी सर्व लष्करी अधिकाऱ्यांशी सीमेवरील परिस्थितीबाबत चर्चा केली, तसेच लष्कराने केलेल्या संरक्षण सज्जतेचाही आढावा घेतला.चीनकडून आगळीक सुरूचआयटीबीपी प्रमुख एस एस देसवाल देखील गेल्या सहा दिवसांपासून लद्दाखमध्ये आहेत. दर तासाला ते तैनात सैनिकांकडून अहवाल घेतात. पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाºयावर स्वहद्दीत भारताने २ हजारांपेक्षाही जास्त आयटीबीपी जवान तैनात केले आहेत.भारताने मात्र आता मोक्याच्या जागी सैन्य तैनात केल्याने ड्रॅगनला धडकी भरली. या भागात चीननेदेखील स्वहद्दीत विध्वंसक टँक, रडार यंत्रणा कार्यान्वित केली. भारताकडूनही लढाऊ टँक पुढे नेण्यात आले आहेत.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावmanoj naravaneमनोज नरवणेIndian Armyभारतीय जवान