शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

India China Faceoff : मोदी सरकार चीनविरोधात अ‍ॅक्शन मोडमध्ये, 'हा' मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 08:53 IST

India China Faceoff : भारत आणि चीनदरम्यान असलेला तणाव वाढत आहे. तर दुसरीकडे देशभरात चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे

नवी दिल्ली - भारत आणि चीन सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात संघर्ष झाला. भारतीय सीमेवरील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांच्या हल्ल्यात भारताचे 20 जवान शहीद झाले. काही वृत्तसंस्था व वृत्तवाहिन्यांनी भारताने या कारवाईला जशास तसे उत्तर देत चीनचे 43 सैनिक मारल्याचा दावाही केला आहे. मात्र चीनने अद्याप मृतांचा आकडा जाहीर केलेला नाही. भारत आणि चीनदरम्यान असलेला तणाव वाढत आहे. तर दुसरीकडे देशभरात चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अनेकांनी तर आपल्या फोनमधून चीनी अ‍ॅप्स देखील हटवून याची सुरुवात केली होती. याच दरम्यान केंद्रातील मोदी सरकारने चीनला मोठा दणका दिला. लोकप्रिय अ‍ॅप टिकटॉकसह 59 चिनी अ‍ॅप्सवर मोदी सरकारने बंदी घातली. यानंतर आता केंद्र सरकार आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. 

भारत आणि चीनदरम्यान असलेल्या तणावानंतर भारतात गुंतवणूकीसाठी आलेल्या 50 चीनी कंपन्यांच्या प्रस्तावावर फेरविचार करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. हा निर्णय झाला तर तो चीनला आणखी एक मोठा दणका असू शकतो असं म्हटलं जात आहे. देशात केंद्र सरकारने नवीन स्क्रीनिंग पॉलिसी आणली आहे. यामध्ये भारताच्या शेजारच्या देशांना भारतात कुठेही गुंतवणूक करायची असल्यास त्यांना आधी केंद्र सरकारची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आलं आहे.

भारत सरकारच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाचा चीनला फटका बसला आहे. भारतात आता गुंतवणूक करण्यासाठी सरकारची परवानगी घेणं अनिवार्य असणार आहे. 50 चिनी कंपन्यांनी गुंतवणुकीचे प्रस्ताव दिले आहे. त्या सर्व प्रस्तावांचा फेरविचार होण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे. भारताने हा निर्णय घेतला गेला तर चिनी कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. या आधी सरकारने 59 चिनी Appsवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चीनचं मोठं नुकसान झालं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे सांगत भारतात 59 चिनी मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये टिकटॉक, यूसी ब्राऊझर आणि हॅलो अ‍ॅप यासारख्या लोकप्रिय अ‍ॅप्सचा समावेश आहे. केंद्र सरकारने भारताच्या सुरक्षिततेला धोका ठरू शकणाऱ्या 59 चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला. बाजारात कोट्यवधींच्या संख्येने विकल्या जाणाऱ्या चिनी कंपन्यांच्या मोबाईल फोनमध्ये यापैकी बरीच लोकप्रिय अ‍ॅप इनबिल्ट पद्धतीने उपलब्ध असल्याने सरकारने या अ‍ॅप्सचा वापर करण्यासही बंदी घातली आहे. या अ‍ॅप्समुळे खासगी डेटा व खासगीपण यांच्यावर आक्रमण होत असल्याच्या तक्रारी आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : पाळीव प्राण्यांपासून कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका?; WHO ने दिली महत्त्वाची माहिती

CoronaVirus News : धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये 3 महिने पगार नसल्याने दिव्यांग शिक्षिकेची आत्महत्या 

CoronaVirus News : कोरोनाच्या भीतीने 'त्याने' उचललं टोकाचं पाऊल अन्...

"हे खरंच सरकार नाही CIRCUS आहे", नितेश राणेंचा हल्लाबोल

"भविष्यात अपयशाच्या केस स्टडीमध्ये कोरोना, GST आणि नोटबंदी शिकवलं जाईल"

भाजपाच्या 'या' नेत्याला मिळणार प्रियंका गांधींचा बंगला; 'हे' आहे कारण

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावIndiaभारतchinaचीनbusinessव्यवसायNarendra Modiनरेंद्र मोदी