India China FaceOff: आमच्या हद्दीत गस्त घालणा-या जवानांच्या कर्तव्यात अडथळा आणला, भारताचा चीनवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 05:11 AM2020-06-21T05:11:36+5:302020-06-21T06:17:56+5:30

India China FaceOff: उलट भारतीय हद्दीत गस्त घालणा-या भारतीय जवानांच्या कर्तव्यात तुम्हीच अडथळा आणला, या वस्तुस्थितीचा उल्लेख करून चीनच्या कागाळ््या अमान्य केल्या.

India China FaceOff: India rejects China's Claim for Galvan Valley | India China FaceOff: आमच्या हद्दीत गस्त घालणा-या जवानांच्या कर्तव्यात अडथळा आणला, भारताचा चीनवर हल्लाबोल

India China FaceOff: आमच्या हद्दीत गस्त घालणा-या जवानांच्या कर्तव्यात अडथळा आणला, भारताचा चीनवर हल्लाबोल

Next

टेकचंद सोनवणे 
नवी दिल्ली : गलवान खोेरे आमचे असल्याचा चीनचा कांगावा धुडकावून भारताने ड्रॅगनचे पितळ उघडे पाडले. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अत्यंत कठोर शब्दात भूमिका स्पष्ट केली. चीनचा दावा अतिशयोक्तीपूर्ण व अस्वीकार्ह असल्याचे सुनावत (चीनच्या) आधीच्या ऐतिहासिक भूमिकेशीदेखील हा दावा विसंगत असल्याचे सांगून भारताने अप्रत्यक्षपणे ड्रॅगनचा जमिनीचा हव्यास जगासमोर आणला. उलट भारतीय हद्दीत गस्त घालणा-या भारतीय जवानांच्या कर्तव्यात तुम्हीच अडथळा आणला, या वस्तुस्थितीचा उल्लेख करून चीनच्या कागाळ््या अमान्य केल्या.
लाईन आॅफ अ‍ॅक्च्युअल कंट्रोलमध्ये आपल्या हद्दीत गस्त घालणाºया भारतीय जवानांना बाधा आणण्याचा प्रयत्न चीनकडूनच मे मध्येच सुरू झाला. जवानांकडून त्यास लष्करी शिष्टाचारासह विरोध झाला. त्यामुळे भारताने पूर्वस्थिती बदलली नाहीच. इतर सीमेप्रमाणेच इथेही जवानांनी एलएसी सांभाळली, अशी ठाम भूमिका भारताने पाचव्याही दिवशी कायम ठेवली. १५ जूनला गलवान खो-यातील झटापटीत २० भारतीय जवानांना वीरमरण आले. चीनने आपल्या जखमी वा मृत सैनिकांची माहिती दडवून ठेवली आहे. दरम्यान, दगाफटका होण्याची शक्यता असल्याने भारताने लद्दाख सीमेवर गस्त वाढवली आहे. दोन्ही देशांमध्ये लष्कर स्तरावर चर्चा पुढच्याही आठवड्यात सुरु राहील. गलवान खोºयात हातपाय पसरण्याच्या तयारीत असलेल्या चीनला भारतीय जवानांनी प्रत्युत्तर दिले आहे. लष्कराच्या अभियंतांनी अवघ्या ७२ तासांमध्ये युद्धपातळीवर काम करून गलवान नदीवर स्व-हद्दीत पूल बांधला. त्यामुळेच ड्रॅगन अस्वस्थ झाला.
स्व हद्दीत बांधकाम
गलवान नदीचा प्रवाह विस्कळीत करण्यासाठी स्वत:च्या हद्दीत रस्ते बांधायची तयारी चीनने सुरू केली आहे. अर्थ इमॅजिंग कंपनी प्लॅनेट लॅब्जच्या हवाल्याने काही छायाचित्रे पाश्चिमात्य वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केली. भारतदेखील आपल्या हद्दीतील बांधकामे सुरूच ठेवणार आहे.
माध्यमांची गळचेपी
चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिजियान झाओ यांनी प्रश्न विचारणाºया भारतीय पत्रकार, अभ्यासकांना अधिकृत टिष्ट्वटर अकाउंटवरून ब्लॉक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वपक्षीय बैठकीतील निवेदन बीजिंगमधील भारतीय दूतावासाने चिनी वुई चॅटवर अपलोड केले. मात्र ‘राष्ट्रीय सुरक्षेला बाधा’ या कारणावरून ते चिनी सरकारने काढून टाकले.
>सॉफ्ट डिप्लोमसी आक्रमक; नेपाळची सावध भूमिका
आॅल इंडिया रेडिओनेदेखील तिबेटीअन वर्ल्ड सर्व्हिसवरून 'खºया' बातम्या ऐकण्याचे आवाहन श्रोत्यांना केले. सॉफ्ट डिप्लोमसीत भारतानेदेखील आता आक्रमक भूमिका घेतली आहे. भारताचे मित्रराष्ट्र नेपाळने कुणाचीही बाजू न घेता सावध भूमिका घेत दोन्ही शेजारी देश शांततेच्या मागार्ने हा प्रश्न सोडवतील, अशी प्रतिक्रिया दिली. नेपाळच्या निवेदनात भारतानंतर चीनचे नाव आहे, याकडे सर्वांचे लक्ष वेधले. तिथे सत्ताधारी राजकीय पक्षात दोन गट पडले असून ‘रोटी-बेटी’ व्यवहार असलेल्या भारताविरोधात भूमिका घेण्यास अनेकांनी नकार दिला. अंतर्गत दबाव वाढल्याने नेपाळने चीनची तळी न उचलण्याचा सूज्ञपणा दाखवला. आता बांगलादेशाच्या भूमिकेवर सर्वांचे लक्ष आहे. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, रशिया, आॅस्ट्रेलिया हे देश भारताच्या बाजूने उभे राहिले आहेत.
>राजकारण सुरूच
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वपक्षीय बैठकीतील निवेदनावर राजकारण सुरू झाले आहे. भारताच्या इंचभर हद्दीतही कुणी नाही, या मोदींच्या विधानावर काँग्रेस नेते व माजी संरक्षण मंत्री पी. चिंदबरम, माजी परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी स्पष्टीकरण मागितले. चीनने आपला भूभाग बळकावल्याचा संभ्रम त्यामुळे निर्माण झाला. पंतप्रधान कार्यालयाने त्यावर स्पष्टीकरण दिले. प्रत्यक्ष ताबा रेषेच्या बदलास भारताची परवानगी नाही.
देशाचे सार्वभौमत्व व अखंडता अबाधित आहे. भारतीय हद्दीत कुणीही शिरलेले नाही शिवाय आपल्या लष्करी चौक्यांवरही कुणाचा ताबा नसल्याचे पंतप्रधान बैठकीत म्हणाले होते. परंतु त्यावरच प्रश्नचिन्ह लावून वाद निर्माण होणे दुदैर्वी आहे. भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्यांना ठोस प्रत्यूत्तर देवू, असे पीएमओने म्हटले आहे.
गलवान खोºयात एलएसीनजीक चीनने केलेला बांधकामाचा प्रयत्न भारतीय जवानांनी रोखला, असेही यात नमूद आहे.

Web Title: India China FaceOff: India rejects China's Claim for Galvan Valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.