शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

India China FaceOff: कॅटकडून 'या' ५०० चिनी वस्तूंवर बहिष्काराचा निर्णय, जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 06:49 IST

India China FaceOff: लडाखमध्ये चिनी सैनिकांनी भारतीय जवानांवर केलेल्या हल्ल्यावर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, व्यापाऱ्यांनी कडक शब्दांत चीनला सुनावलं आहे.

नवी दिल्लीः लडाखच्या LACवर चीन अन् भारतामध्ये मोठी चकमक झाली असून, भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत, तर चीनच्या 43 सैनिकांचा खात्मा झाल्याची माहिती मिळाली आहे. या संघर्षामुळे भारतात चीनविरोधात वातावरण पेटलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) या व्यापारी संघटनेने देशात आयात केल्या जाणाऱ्या चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कॅटने यासाठी 500 हून अधिक चिनी उत्पादनांची यादी जाहीर केली आहे. लडाखमध्ये चिनी सैनिकांनी भारतीय जवानांवर केलेल्या हल्ल्यावर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, व्यापा-यांनी कडक शब्दांत चीनला सुनावलं आहे.जेव्हा जेव्हा चीनला संधी मिळेल तेव्हा तो भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देतो. चीनची ही वृत्ती देशाच्या हिताच्या विरोधात आहे. देशवासीयांची भावना लक्षात घेऊन कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा आणि भारतीय वस्तूंच्या वापरास प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे, असंही कॅटनं म्हटलं आहे. 'भारतीय वस्तू-आमचा अभिमान' ही राष्ट्रीय मोहीम कॅटनं चालवली असून, त्याअंतर्गत मंगळवारपासून 500हून अधिक बहिष्कार टाकण्यात येणाऱ्या चीन वस्तूंची मोठी यादी प्रसिद्ध केली. त्याअंतर्गत चीनमध्ये उत्पादित होणारी आणि भारतात आयात केली जाणारी 3000 हून अधिक उत्पादने आहेत.कॅटने चिनी उत्पादनांवर घातली बंदी कॅटने मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात या वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. या चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेऊन कॅटनं 2021 डिसेंबरपर्यंत चीनकडून आयात होणा-या वस्तूंमधून 13 अब्ज डॉलर्स म्हणजेच जवळपास 1 लाख कोटी रुपये तुटीची पूर्तता करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. बहिष्कार घालण्यात आलेल्या वस्तूंमध्ये दररोज कामी येणाऱ्या वस्तू, खेळणी, फर्निशिंग फॅब्रिक, टेक्सटाइल, बिल्डर हार्डवेअर, पादत्राणे, वस्त्र, स्वयंपाकघरातील वस्तू, लगेज, हँड बॅग, सौंदर्यप्रसाधने, गिफ्ट आयटम, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, फॅशनच्या वस्तू, खाद्य, घड्याळे, दागिने, कपडे, स्टेशनरी, कागद, घरगुती वस्तू, फर्निचर, लायटिंग, आरोग्य उत्पादने, पॅकेजिंग उत्पादने, ऑटो पार्ट्स, सूत, फेंगशुई वस्तू, दिवाळी आणि होळीचं सामान, गॉगल, टेपेस्ट्री साहित्य इत्यादींचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात 3000पेक्षा जास्त वस्तूंची केली निवडकॅटचे ​​राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भारतीया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी कॅटच्या मोहिमेविषयी स्पष्टीकरण देताना सांगितले की, सध्या चीनकडून भारतात 5.2 लाख कोटी अर्थात 70 बिलियन डॉलरचं वार्षिक सामान आयात केले जाते. पहिल्या टप्प्यात कॅटने 3000हून अधिक वस्तू निवडल्या आहेत, ज्यातील काही भारतात बनवल्या जातात, पण स्वस्ताईच्या मोहात आतापर्यंत या वस्तू चीनमधून आयात केल्या जात होत्या. या वस्तूंच्या निर्मितीमध्ये कोणत्याही प्रकारच्या तंत्रज्ञानाची आवश्यकता नाही. म्हणूनच भारतात तयार केलेल्या वस्तूंचा वापर चीनच्या वस्तूंच्या जागी खूप सहजपणे करता येऊ शकतो आणि भारत या वस्तूंसाठी चीनवरील आपले अवलंबित्व कमी करू शकतो.काय म्हणणं आहे संघटनेचं?भारतीया आणि खंडेलवाल म्हणाले की, भारतात अशा अनेक वस्तू आहेत, ज्या देशांतर्गत आणि विदेशी कंपन्या भारतात बनवतात. सध्या अशा वस्तू बहिष्काराच्या कक्षेतून बाहेर ठेवल्या जाणार आहेत. चीनमध्ये बनवलेल्या वस्तूंची आयात भारतात होऊ नये, हा आमच्या मोहिमेचा उद्देश आहे. प्रत्येक प्रकारच्या चिनी वस्तूचा बहिष्कारात समावेश आहे. ज्या वस्तूंमध्ये तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण आहे, सध्या त्या वस्तू बहिष्कारात समाविष्ट नाहीत. कारण या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा पर्याय भारतात विकसित होत नाही किंवा भारताच्या कोणत्याही मित्र राष्ट्राकडून तो निर्मित केला जात नाही, तोपर्यंत अशा तंत्रज्ञानाचा उपयोगातील वस्तू वापरण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. कॅट ही बाब केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्यासमोर ठेवली आहे. तसेच लघुउद्योग, स्टार्टअप्स आणि देशातील अन्य उद्योजकांना अशा वस्तू भारतात तयार करण्यासाठी प्रोत्साहन द्यावं आणि त्यांना सर्व प्रकारची सरकारनं मदत करावी, अशी विनंतीही कॅटकडून करण्यात आली आहे. 

हेही वाचा

CoronaVirus News: "अखेर सत्य पुढे आलेच"; कोरोनाबळींचा आकडा वाढला, फडणवीसांनी सरकारवर निशाणा साधला!

CoronaVirus: डॉक्टरांच्या लढ्याला मोठं यश! 'या' औषधानं व्हेंटिलेटरवरचे रुग्णही झाले ठणठणीत

India China Faceoff : मोदी सरकारनं चीनचा बदला घ्यावा, जवान शहीद झाल्यानं ओवैसी संतप्त

दौलत बेग ओल्‍डी : जगातील सर्वात उंचावरची हवाई पट्टी, चीनच्या डोळ्यात खुपतेय भारताची 'सर्वोच्च' शक्ती

...म्हणून भारत-चीनसाठी महत्त्वपूर्ण आहे गलवान खोरे, जिथे आज सैनिकांमध्ये झाली झटापट

India China Faceoff: LACवरच्या चकमकीनंतर मोदी सरकार ऍक्शनमध्ये; राजनाथ सिंहांनी तिन्ही सैन्यदलांची बोलावली बैठक 

CoronaVirus News: आजच्या घडीला मुंबईत यायची माझी हिंमत नाही, पण...; नितीन गडकरींची 'मन की बात'

आपत्तीत संधी! योगी आदित्यनाथ दीड लाख प्रवासी मजुरांना देणार जॉबचं ऑफर लेटर

CoronaVirus News: अमेरिकेनं मैत्री निभावली; भारताकडे १०० व्हेंटिलेटर्स सोपवली

टॅग्स :chinaचीन