India China FaceOff: चीनच्या सैनिकांनी ८ किमी पट्टी बळकावली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 03:56 IST2020-06-22T03:56:34+5:302020-06-22T03:56:34+5:30
मे महिन्याच्या प्रारंभी पेनगोंग त्सोजवळ चीनने हे कृत्य केल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.

India China FaceOff: चीनच्या सैनिकांनी ८ किमी पट्टी बळकावली?
नवी दिल्ली : गलवान खोऱ्यातील पूर्व गलवान भागात सध्या नेमकी काय स्थिती आहे, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे; परंतु चीनच्या सैनिकांनी ८ किलोमीटरची पट्टी बळकावली असून, तेथे बळजबरीने अनेक बंकर्स व तटबंदी बांधली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मे महिन्याच्या प्रारंभी पेनगोंग त्सोजवळ चीनने हे कृत्य केल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.
चीनच्या सैनिकांनी पेनगोंग त्सोच्या उत्तर किनाºयावर पर्वतीय भागावरील चार टापूंवरही नियंत्रण मिळवल्याचे सांगितले जात आहे. गलवान खोरे व गोग्रा-हॉट स्प्रिंग्ज येथील पॅट्रोलिंग पॉइंट १४, १५ व १७ वर चर्चा सुरू असताना ही घटना घडल्याचेही समजते.
अधिकृत सूत्रांनी शनिवारी सांगितले की, आता या भागावर भारताचे नियंत्रण आहे. गलवान खोºयाच्या भागातील पीपी-१४ येथील भाग आपल्या ताब्यात आहे. १५ जून रोजी जेथे भारत व चीनच्या सैनिकांमध्ये झटापट झाली होती व भारताचे २० जवान शहीद झाले होते व ७६ जण जखमी झाले होते, तीच ही जागा आहे.