India China FaceOff: अरुणाचलच्या सीमेवर चीनला बसणार दणका; भारतीय सैन्यानं पहिल्यांदाच तैनात केले Aviation Brigade

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 09:40 AM2021-10-19T09:40:08+5:302021-10-19T09:43:09+5:30

Arunachal Pradesh India China Border Crisis: अरुणाचल प्रदेशासारख्या डोंगरदऱ्या, घनदाट जंगलाच्या परिसरात हेलिकॉप्टर मोठ्या प्रमाणात फायद्याचं ठरतं.

India China FaceOff: Army deployed an Aviation Brigade to assist troops at LAC Arunachal Pradesh | India China FaceOff: अरुणाचलच्या सीमेवर चीनला बसणार दणका; भारतीय सैन्यानं पहिल्यांदाच तैनात केले Aviation Brigade

India China FaceOff: अरुणाचलच्या सीमेवर चीनला बसणार दणका; भारतीय सैन्यानं पहिल्यांदाच तैनात केले Aviation Brigade

googlenewsNext
ठळक मुद्देआसामच्या मिसामारी येथे भारतीय सैन्याचं सर्वात मोठं एविएशन बेस आहे.अरुणाचल प्रदेशात मोर्चा सांभाळण्यासाठी स्वदेशी अटॅक हेलिकॉप्टर रुद्र तैनात आहेभारतीय सैन्याचा एक भाग हेडक्वॉर्टरमध्ये पहाडावरील लढाईचं प्रशिक्षण घेत आहे.

ईटानगर – भारतीय सैन्याने अरुणाचल प्रदेशात पहिल्यांदाच एविएशन ब्रिगेड तैनात केले आहे. या ब्रिगेडमध्ये अटॅक हेलिकॉप्टर(Attack Helicopter) आहे. वेगाने सैनिकांना लाइन ऑफ कंट्रोलपर्यंत(LAC) पोहचवण्यासाठी चिनूक (Chinook) आणि एम १७ सारखे मोठे माल वाहतूक हेलिकॉप्टर आहेत. त्याचसोबत सर्वात महत्त्वपूर्ण देखरेखीसाठी ड्रोनचा समावेशही करण्यात आला आहे.

अरुणाचल प्रदेशासारख्या डोंगरदऱ्या, घनदाट जंगलाच्या परिसरात हेलिकॉप्टर मोठ्या प्रमाणात फायद्याचं ठरतं. याठिकाणी हेलिकॉप्टर्स सैनिकांना ने-आण करण्यासाठी, शस्त्र, दारुगोळा पोहचवण्यासाठी, जखमी सैनिकांच्या मदतीसाठी काम करतं. येथील वातावरण हीदेखील मोठी समस्या आहे. खराब वातावरणामुळे घाट पार करणं खूप कठीण असतं. त्यासाठी हेलिकॉप्टर आणि पायलट दोघांनाही कठीण परीक्षेचा सामना करावा लागतो.

अटॅक हेलिकॉप्टरची महत्त्वाची भूमिका

वेगाने हल्ला करण्यासाठी अटॅक हेलिकॉप्टर कामाला येते. आसामच्या मिसामारी येथे भारतीय सैन्याचं सर्वात मोठं एविएशन बेस आहे. ज्याठिकाणाहून दिवसरात्र हेलिकॉप्टर लाइन ऑफ कंट्रोलच्या दिशेने उड्डाण घेत असतात.

स्वदेशी अटॅक हेलिकॉप्टर ‘रुद्र’ तैनात

अरुणाचल प्रदेशात मोर्चा सांभाळण्यासाठी स्वदेशी अटॅक हेलिकॉप्टर रुद्र तैनात आहे. जो शत्रूच्या कुठल्याही ठिकाणाला उद्ध्वस्त करण्याची क्षमता ठेवतो. अरुणाचल प्रदेशाच्या LAC जवळ पोहचताच याठिकाणी किती आव्हानं आहेत याची जाणीव होते. LAC जवळ सर्वात मोठं शहर तवांग आहे. ज्यावर चीनची नजर आहे. १९६२ च्या युद्धात चीनने तवांगवर कब्जा केला होता परंतु त्यानंतर भारतीय सैन्याने या संपूर्ण परिसरात आपली ताकद वापरत मजबूत केला आहे.

मान्सूनमध्ये अरुणाचल प्रदेशच्या पहाडी भागात बर्फवृष्टी, पाऊस यामुळे रस्ते वाहतूक बंद होते. पूर्वी तवांगपर्यंत पोहचण्याचा एकच मार्ग होता. परंतु काही वर्षात तवांगला जाण्यासाठी आणखी एक रस्ता बनवण्यात आला आहे. तिसऱ्या रस्त्याचं काम सुरू आहे. अधिक रस्ते असल्याने कधी पुरवठा मार्ग बंद होण्याचा धोका नसतो. परंतु सर्वात फायदेशीर टनल्स आहेत. ज्यामुळे सहजपणे डोंगर कमी वेळेत पार करता येतात. भारतीय सैन्याचा एक भाग हेडक्वॉर्टरमध्ये पहाडावरील लढाईचं प्रशिक्षण घेत आहे. या परिसरात बनवण्यात आलेली पहिली एविएशन ब्रिगेड दिवसरात्र शत्रू आणि आपल्या देशातील सैन्यावर लक्ष ठेवत असतं. याठिकाणाहून अटॅक हेलिकॉप्टर, सैनिकांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर आणि ड्रोनवर नियंत्रण ठेवण्यात येते. भारतीय सैन्य यावेळी हेरोन मार्कच्या १ ड्रोनचा वापर २००-२५० किमी परिसरावर नजर ठेवण्यासाठी होतो.

Web Title: India China FaceOff: Army deployed an Aviation Brigade to assist troops at LAC Arunachal Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.