शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

India China FaceOff: भारतद्वेष्ट्या चिनी जनरलनेच दिला हल्ल्याचा आदेश; अमेरिकी गुप्तहेरांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 11:14 IST

भारत-चीन सीमेवर तणाव मोठ्याप्रमाणात वाढला आहे. चीनने लढाऊविमाने तैनात केल्याने भारतालाही मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा, लढाऊ विमाने आणि डोंगररांगांमध्ये युद्ध करण्यासाठी प्रशिक्षित फौज तैनात करावी लागली आहे.

गेल्या आठवड्याच्या सुरुवातीलाच चीनच्या सैन्याने भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला होता. यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले. मात्र, चीनला दोन अधिकाऱ्यांसह 40 सैनिकांना गमवावे लागले. चीनचे भारताला जबर धक्का देण्याचे कृत्य त्यांच्यावरच उलटल्याचा दावा अमेरिकेच्या गुप्तहेरांनी केला आहे. 

भारत-चीन सीमेवर तणाव मोठ्याप्रमाणात वाढला आहे. चीनने लढाऊविमाने तैनात केल्याने भारतालाही मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा, लढाऊ विमाने आणि डोंगररांगांमध्ये युद्ध करण्यासाठी प्रशिक्षित फौज तैनात करावी लागली आहे. सीमाभागातील रस्ते आणि पायाभूत सुविधांचे निर्माण करण्यासाठीही वेग आला आहे. कारण युद्धकाळात सामग्री वेगाने पोहोचविणे गरजेचे असणार आहे. चीनच्या बाजुचा भाग हा पठारी आहे तर भारतीय बाजुचा भाग हा हिमालयाच्या पर्वतरांगा असल्याने डोंगराळ आहे. 

गेल्या आठवड्यात भारतीय जवानांवर चीनने काटेरी लाठ्या, दगड घेऊन हल्ला केला होता. सायंकाळी 4 वाजता सुरु झालेला हा हल्ला रात्रभर सुरु होता. मात्र, भारतीय जवानांनी वेळीच सावध होत चीनचा हा हल्ला परतवून लावताना त्यांचे ४० सैनिक मारले होते. यावर चीनने भारतानेच पहिला हल्ला केल्याचे आरोप लावणे सुरु केले आहे. मात्र, अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने चीनची पोलखोल केली आहे. चीन लष्कराच्या जनरल रँकच्या अधिकाऱ्यानेच गलवानमध्ये तैनात असलेल्या सैनिकांना भारतीय जवानांवर हल्ला करण्याचे आदेश दिले होते. यामुळे तिथे हिंसक घटना घडली, असा दावा केला आहे. 

चीनचे वेस्ट थिएटर कमांडचे प्रमुख जनरल झाओ झोंग्की यांनी भारतावर हल्ला करण्याचे आदेश दिले होते. झाओ हे भारतद्वेष्टे समजले जातात. त्यांनी या आधीही भारताविरोधात अनेकदा कारवाई केली आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की, अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांसमोर चीन दुबळा पडता नये. याच विचारातून भारतावर हल्ला करण्याची चाल खेळली गेली. मात्र, त्यांना वाटत होते तसे घडलेच नाही. उलट चीनच्या लष्कराचेच मोठे नुकसान झाले आहे. चीनने गलवान घाटीमध्ये मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमविली आहेत. जेव्हा भारतीय जवान चर्चा करण्यासाठी तेथे गेले तेव्हा चीनचे सैनिक दबा धरून बसलेले होते. यानंतर त्यांनी हल्ला केला. यावेळी जेव्हा भारताचे दुसरे जवान मदतीसाठी धावले तेव्हा हिंसक झटापट झाली, असा दावा अमेरिकेने केला आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

Maruti Suzuki ची नवीन सीएनजी कार लाँच; जाणून घ्या किंमत अन् फिचर्स

'काहीतरी नवे येतेय'! चीनची कंपनी एकच धमाका करण्याच्या तयारीत; जाणून घ्या...

India China FaceOff: हाय रे दैवा! 'मेड इन चायना' बुलेटप्रूफ जॅकेट घालूनच चीनसोबत लढणार?

India China Face Off: चीनी सैनिकांची खैर नाही! भारताचे सर्वात खतरनाक पहाडी योद्धे तैनात

फुरफुरणाऱ्या नेपाळची पुरती जिरली; चीनने अख्खी गावेच घशात घातली

...आता सुशांत सिंग राजपूतसाठी लढणार; करणी सेनेचा बॉलिवूडला इशारा

शक्तीहीन कोरोना! "वाघाचा जंगली मांजर बनला"; मोठ्या तज्ज्ञ डॉक्टरांचा दावा

टॅग्स :chinaचीनIndian Armyभारतीय जवानladakhलडाखAmericaअमेरिका