शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

India China Face Off: चीन नरमला, तणाव निवळला; सैन्य माघारीवरून दोघांत सहमती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 05:57 IST

प्रत्यक्ष सैन्य मागे घेण्यावरून गलवान खोऱ्यात हाणामारी होऊन एका कर्नलसह २० भारतीय जवान शहीद झाले. चीनचेही ४३ सैनिक ठार वा जखमी झाले होते.

नवी दिल्ली : पूर्व लडाख सीमेवर हाणामारी होऊन तणावास कारणीभूत ठरलेल्या वादग्रस्त ठिकाणांहून सैन्य माघारी घेण्यावर भारतचीन यांच्यात सहमती झाली. चीनने नरमाई दाखवल्याने दोन्ही देशांमधील तणाव निवळला. ६ जूनला अशीच सहमती झाली होती. पण नंतर प्रत्यक्ष सैन्य मागे घेण्यावरून गलवान खोऱ्यात हाणामारी होऊन एका कर्नलसह २० भारतीय जवान शहीद झाले. चीनचेही ४३ सैनिक ठार वा जखमी झाले होते.गलवान खो-यातील पॅट्रोलिंग पॉइंट १४ व १५, गोगराच्या पॅट्रोलिंग पॉइंट १७ ए , हॉटस्प्रिंग, फिंगर ४ तसेच पॅनगाँग त्सो सरोवर ही वादाची प्रमुख ठिकाणे आहेत. येथून दोन्ही सैन्यांनी माघार घेण्याचे ठरले तरी त्याला काही दिवस लागतील. त्याचा तपशील ठरविण्यासाठी बैठका होतील आणि माघारीचे काम टप्प्याटप्प्याने होईल.>‘जैसे थे’ स्थितीसाठी भारताचा आग्रहसीमेवर ६ जूनच्या आधीची ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवण्याचा भारताने बैठकीत आग्रह धरला. तसेच सैन्य केवळ माघारी न घेता गेल्या काही आठवड्यांत सैन्य तुकड्या व अवजड युद्धसामुग्रीची सीमेजवळ केलेली जमवाजवही पूर्वीच्या पातळीवर आणण्यावर भारताने भर दिला. आधीच्या बैठकीत झालेल्या सहमतीचे चिनी सैन्याकडून उल्लंघन झाल्यानेच गलवान खोºयातील दुर्दैवी घटना घडली, हेही भारताने चीनला ठासून सांगितले.>११ तास चालली बैठकसोमवारी रात्री दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या ११ तासांच्या बैठकीत सहमती झाली. भारताकडून यात लेफ्ट. जनरल हरिंदर सिंह या बैठकीत व चीनकडून मेजर जनरल लिऊ लिन चर्चेत सहभागी होते.>लष्करप्रमुख नरवणे लडाख सीमेवरलष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे दोन दिवसांच्या लडाख भेटीसाठी मंगळवारी दुपारी लेह येथे पोहोचले. तिथे लष्करी तुकड्यांच्या कमांडरांसोबत चर्चा करून, ते प्रत्यक्ष सीमेवर स्थितीचा आढावा घेतील. सीमेवर तणाव निर्माण झाल्यानंतर लष्करप्रमुखांनी सीमेवर जाण्याची ही दुसरी वेळ असेल. लेहला येण्यापूर्वी लष्करप्रमुखांनी सर्व लष्करी कमांडरांची बैठक घेऊन सीमेवरील स्थिती व सैन्यसज्जता याचा आढावा घेतला होता. गेल्या आठवड्यात हवाईदल प्रमुख आर. के. एस. भादुरिया यांनीही सीमेलगतच्या लेह व श्रीनगर हवाईतळांना भेट दिली होती. त्यानंतर हवाईदलाची अनेक लढाऊ विमाने सीमेवर तैनात करण्यात आली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीchinaचीनIndiaभारत