शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

चीनबरोबरची चर्चा निष्फळच; LACवर लष्कर अलर्ट, चिनी सैनिकांनी असा केला होता भारतीय जवानांवर भ्याड हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 12:49 IST

ज्या ठिकाणावर ही चकमक झाली त्याच्या खालून श्योक नदी वाहते. अनेक सैनिक या नदीत वाहून गेल्याचेही वृत्त आहे.

ठळक मुद्देदगड, काटेरी तारा आणि खिळे असलेल्या काठ्यांनी भारतीय जवानांवर हल्ला.अनेक सैनिक श्योक नदीत वाहून गेल्याचे वृत्त आहे.भारताने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात 20 जवानांना हौतात्म्य आल्याचे म्हटले आहे.

नवी दिल्ली : प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) चीनबरोबरचा तणाव वाढतच चालला आहे. लष्कराच्या सूत्रांनी म्हटले आहे, की कालपासून सुरू असलेल्या चर्चेचा विशेष परिणाम झालेला नाही. सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण आहे. चर्चा करूनही परिस्थितीत कसल्याही प्रकारचा बदल झालेला नाही. केवळ लडाखच नाही, तर एलएसीवर इतर भागांतही लष्कर अलर्ट मोडवर आले आहे.

याच दरम्यान, भारत-चीन सीमेवर हौतात्म्य आलेल्या आपल्या 20 जवानांची नावे आज जाहीर करण्यात येतील. चिनी सेन्यासोबत झालेल्या चकमकीत या जवानांना हौतात्म्य आले. ही घटना 15-16 जूनदरम्यानच्या रात्री घडली. भारतीयसैनिकांचे पथक कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष बाबू यांच्या नेत्रृत्वात चिनी कॅम्पमध्ये गेले होते. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे शस्त्र नव्हते. 

India China Dispute : गलवान खोऱ्यात चीननं पसरवलय जाळं; हळू-हळू अशी वाढवली ताकद

दगड, काटेरी तारा आणि खिळे असलेल्या काठ्यांनी भारतीय जवानांवर हल्ला -हे पथक चिनी सैन्याच्या मागे हटण्याच्यामुद्यावर झालेल्या सहमतीसंदर्भात बोलणी करण्यासाठी गेले होते. मात्र, तेथे भारतीय जवानांना चिनी सैन्याकडून धोका मिळाला. दगड, काटेरी तारा आणि खिळे असलेल्या काठ्यांनी चिनी सैनिकांनी या पथकावर हल्ला केला. यात कमांडिग ऑफिसर कर्नल संतोष बाबू आणि दोन जवान तेथेच शहीद झाले. तर अनेक जवान जखमी झाले.

जाणून घ्या, काय आहेत पेंगाँग सरोवराचे 'फिंगर्स'?, यांच्यामुळेच भारत-चीन आले 'आमने-सामने'

अनेक सैनिक श्योक नदीत वाहून गेल्याचेही वृत्त - ज्या ठिकाणावर ही चकमक झाली त्याच्या खालून श्योक नदी वाहते. अनेक सैनिक या नदीत वाहून गेल्याचेही वृत्त आहे. तर अनेक जखमी सैनिकांच्या जखमा याथील शून्यापेक्षाही कमी तापमाणामुळे लवकर न ठीक झाल्याने त्यांना हौतात्म्य आले. भारताने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात 20 जवानांना हौतात्म्य आल्याचे म्हटले आहे.

CoronaVirus News: "जगातील 'या' 170 कोटी लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका", 'हे' आहे कारण

या चकमकीत आपले किती नुकसान झाले, हे सांगण्यासाठी आद्याप चीनने तोंड उघडण्याची हिम्मत केलेली नाही. मात्र तिकडेही मोठे नुकसान झाल्याचे वृत आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, चीनचे एक तर 43 सैनिक मारले गेले आहेत अथवा गंभीररित्या जखमी आहेत. या प्रकरणांनंतर दिल्लीत सातत्याने बैठका होत आहेत.

चीनची भीती की चिथावणी? नेपाळ उचलतोय मोठं पाऊल; आता थेट अमेरिकेलाच देणार 'तगडा' झटका!

कोणाला आले होतात्म्य?चीनच्या या हल्ल्यात १६ बिहार रेजिमेंटचे कर्नल संतोष बाबू व एम. पलानी आणि कुंदन ओझा या जवानांना हौतात्म्य आले. कर्नल बाबू मूळचे तमिळनाडूचे तर पलानी व ओझा हे अनुक्रमे तमिळनाडू व झारखंडचे आहेत. त्यांच्या हौतात्म्याची सूचना कुटुंबियांना लष्कराकडून अधिकृतपणे देण्यात आली. कर्नल बाबू गेले दीड वर्ष चीनच्या सीमेवर तैनात होते व गेल्या डिसेंबरमध्येच त्यांनी ९ रजिमेंट तुकडीचे कमांडिंग आॅफसर म्हणून सूत्रे हाती घेतली होती. ओझा २२ वर्षे लष्करात होते.

CoronaVirus News: कोरोनाचं 'हे' रूप इतर Covid-19च्या रुपापेक्षा 10 पट घातक, देण्यात आलं असं नाव

 

टॅग्स :border disputeसीमा वादBorderसीमारेषाIndiaभारतchinaचीनSoldierसैनिकladakhलडाखIndian Armyभारतीय जवान