शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 08:26 IST

India Canada Relations Update: कॅनडामध्ये झालेल्या जी-७ देशांच्या बैठकीसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. शेवटी या बैठकीसाठी कॅनडाकडून अखेरच्या क्षणी निमंत्रण मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदी या बैठकीला उपस्थित राहिले. तसेच या दौऱ्यामध्ये नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यामध्येही औपचारिक भेट झाली.

गेल्या काही वर्षांमध्ये भारत आणि कॅनडाच्या संबंधांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कॅनडामध्ये झालेल्या जी-७ देशांच्या बैठकीसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. शेवटी या बैठकीसाठी कॅनडाकडून अखेरच्या क्षणी निमंत्रण मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदी या बैठकीला उपस्थित राहिले. तसेच या दौऱ्यामध्ये नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यामध्येही औपचारिक भेट झाली. तसेच दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीतील चर्चेदरम्यान उभय देशांमधील संबंधांमध्ये सुधारणा करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार भारत आणि कॅनडा एकमेकांड्या देशांसाठी उच्चायुक्तांची नियुक्ती करतील. दोन्ही देशांमधील नागरिक आणि व्यवसायांसाठी नियमित सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नव्या उच्चायुक्तांच्या नियुक्तीवर एकमत झालं आहे. गेल्या काही काळात दोन्ही देशांमधील बिघडलेल्या संबंधांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे.

नरेंद्र मोदी आणि माईक कार्नी यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत दोन्ही देशांमधील बिघडलेल्या संबंधांमध्ये सुधारणा करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावलं उचलण्याच्या दृष्टीने चर्चा झाली. या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांनी परस्पर सन्मान, कायद्याचं राज्य आणि सार्वभौमत्व यावर आधारित संबंधांना दृढ करण्यासाठीची कटिबद्धता व्यक्त केली.

तसेच दोन्ही देशांमध्ये नव्या उच्चायुक्तांच्या नियुक्तीवर झालेलं एकमत ही या भेटीमधील सर्वात मोठी घोषणा ठरली.  खलिस्तानच्या मुद्द्यावरून झालेला वाद आणि इतर विवादांमुळे मागच्या काही वर्षांमध्ये भारत आणि कॅनडामधील संबंध बिघडले होते. तसेच दोन्ही देशांनी आपापल्या उच्चायुक्तांना माघारी बोलावले होते. मात्र आता उच्चायुक्तांच्या नव्याने नियुक्तीचा निर्णय झाल्याने त्याचा लाभ दोन्ही देशांमधील नागरिक आणि व्यावसायिकांना होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी ही बैठक सराकात्मक आणि रचनात्मक असल्याचे म्हटले आहे.

याबरोबर दोन्ही देशांनी लवकरच व्यापाराबाबत चर्चा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नरेंद्र मोदी आणि मार्क कार्नी यांनी पुढच्या काळात पुन्हा एकदा भेटण्याचे निश्चित केले आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कॅनडा दौऱ्याची सांगता करताना  जी-७ बैठकीमध्ये जागतिक मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झालल्याचे सांगितले. तसेच या बैठकीच्या यशस्वी आयोजनासाठी कॅनडाच्या सरकार आणि जनतेचे आभार मानले.  

टॅग्स :IndiaभारतCanadaकॅनडाNarendra Modiनरेंद्र मोदी