पुढील वर्षी भारत पुन्हा करू शकतो चंद्रावर ‘सॉफ्ट लँडिंग’
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 04:44 IST2019-11-15T04:44:10+5:302019-11-15T04:44:27+5:30
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) गुरुवारी स्पष्ट केले की, भारत पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये पुन्हा एकदा चंद्रावर ‘सॉफ्ट लँडिंग’चा प्रयत्न करू शकतो.

पुढील वर्षी भारत पुन्हा करू शकतो चंद्रावर ‘सॉफ्ट लँडिंग’
बंगळुरू: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) गुरुवारी स्पष्ट केले की, भारत पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये पुन्हा एकदा चंद्रावर ‘सॉफ्ट लँडिंग’चा प्रयत्न करू शकतो. दोन महिन्यांपूर्वी ७ सप्टेंबरला चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न असफल झाला होता.
इस्रोच्या प्रक्षेपण यान कार्यक्रमाचे दायित्व असलेल्या तिरुवनंतपुरमस्थित ‘विक्रम साराभाई अंतराळ केंद्रा’चे संचालक एस. सोमनाथ यांच्या नेतृत्वात प्रस्तावित ‘चंद्रयान-३’वर अहवाल तयार करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, समितीच्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे. पुढील वर्षीच्या अखेरीस मिशन तयारीसाठी दिशा- निर्देश देण्यात आलेले आहेत. नोव्हेंबरमध्ये अनुकूल काळ आहे.