शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

'मेक इन इंडिया'ला मोठं यश; रशिया, पोलंडला मागे टाकत भारतानं मिळवलं २९० कोटींचं कंत्राट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2020 2:57 PM

भारतात तयार झालेल्या शस्त्र सामग्रीला मागणी; रडार यंत्रणेला आर्मेनियाची पसंती

नवी दिल्ली: रशिया आणि पोलंडला मागे टाकत भारतानं आर्मेनियासोबत मोठा संरक्षण करार केला आहे. भारताची संरक्षण संशोधन विकास संस्था (डीआरडीओ) आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडनं (बीईएल) आर्मेनियासोबत ४ कोटी डॉलरचा (जवळपास २९० कोटी रुपयांचा) करार केला आहे. डीआरडीओ, बीईएलनं केलेल्या करारात स्वाथी वेपन लोकेटिंग रडार यंत्रणेचा समावेश आहे. या यंत्रणेची निर्मिती 'मेक इन इंडिया'च्या अंतर्गत करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रशिया आणि पोलंडनंदेखील याच प्रकारची यंत्रणा खरेदी करण्याची ऑफर आर्मेनियाला दिली होती. या देशांनी चाचणीचंही आयोजन केलं होतं. मात्र आर्मेनियानं भारताच्या रडार यंत्रणेवर विश्वास दाखवत करार केला. करारानुसार भारत आर्मेनियाला चार स्वाथी वेपन लोकेटिंग रडार यंत्रणा देईल. सुमारे ५० किलोमीटर अंतरावरील शत्रूचे मोर्टार, रॉकेट यांचा ठावठिकाणा अतिशय जलद गतीनं शोधून काढण्याची क्षमता या रडार यंत्रणेकडे आहे. वेगवेगळ्या ठिकाणांहून डागण्यात आलेल्या विविध प्रकारच्या हत्यारांची माहिती एकाचवेळी अतिशय अचूकपणे शोधून काढण्याची क्षमतादेखील या रडारमध्ये आहे.भारतीय लष्कर जम्मू-काश्मीरवरील नियंत्रण रेषवर स्वाती वेपन लोकेटिंग रडार यंत्रणेचा वापर करतं. २०१८ मध्ये लष्कराला ही यंत्रणा चाचणीसाठी देण्यात आली. आर्मेनियानं रडार यंत्रणेवर विश्वास दाखवल्यानं भारतीय संरक्षण सामग्रीसाठी नवी बाजारपेठ खुली होणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. युरोपमधील अनेक देश रडार यंत्रणांची निर्मिती करतात. मात्र त्यांच्या तुलनेत भारतात तयार झालेली शस्त्र सामग्री स्वस्त असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. संरक्षण सामग्रीच्या निर्यातीत वाढ करण्यासाठी नव्या बाजारपेठा शोधल्या जाणार आहेत. आग्नेय आशिया, दक्षिण अमेरिका, मध्य पूर्वेतले देश भारतात तयार झालेली अत्याधुनिक शस्त्र सामग्री खरेदी करू शकतात. २०२४-२५ पर्यंत ३५ हजार कोटी रुपयांची शस्त्रास्त्रं निर्यात करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानDRDOडीआरडीओ