शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

धगधगती भारत-बांगलादेश सीमा! आपसांत लग्न झाली, लपून छपून भेटायचे पण २० दिवसांत सगळं बदललं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 18:23 IST

बांगलादेशात सुरु असलेल्या हिंसक आंदोलनात मागील २० दिवसांत ३२८ मृत्यू झालेत.  

पटना - बांगलादेशात अजान सुरू झाली की त्याचा आवाज आमच्या घरापर्यंत येतो. आमच्या इथल्या लोकांची लग्नेही बांगलादेशात झाली आहेत. सुरुवातीला आम्ही लपून छपून ये-जा करत होतो परंतु मागील २० दिवसांपासून सर्व परिस्थिती बदलली आहे. सध्याच्या परिस्थितीत कुणी बांगलादेशात जाण्याचा विचारही करू शकत नाही असं सांगत डोळ्यात अश्रू आणि भीतीही दिसत होती. पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूर येथे राहणाऱ्या कुकरौधा बॉर्डरजवळ राहणाऱ्या व्यक्तीची ही कहाणी आहे. 

बांगलादेशातील हिंसक आंदोलनाचा फटका सीमेजवळ राहणाऱ्या या लोकांच्या आयुष्यावर पडला. कारण त्यांचे बागलादेशात रोटी-बेटी नाते होते. भारत आणि बांगलादेश यांच्यात ४०९६ किमी बॉर्डर आहे. त्यातील २२१७ किमी बॉर्डर पश्चिम बंगालला जोडलेली आहे आणि प.बंगालच्या उत्तरेकडील दिनाजपूर जिल्ह्यापासून बिहारचं किशनगंज अवघ्या २० किमी अंतरावर आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या मार्गेत बांगलादेशी बिहारमध्ये ये-जा करत होते. बिहारमध्ये राहणारे बांगलादेशी याच मार्गाने जातात. 

बांगलादेशात सुरु असलेल्या हिंसक आंदोलनात मागील २० दिवसांत ३२८ मृत्यू झालेत.  भारत बांगलादेश सीमेजवळील एका गावात दैनिक भास्करनं साहिब या व्यक्तीची मुलाखत घेतली. त्यात तो म्हणाला की, माझं घर बॉर्डरपासून १ किमी अंतरावर आहे. नदीच्या या बाजूला आम्ही राहतो त्याबाजूला बांगलादेशी राहतात. आम्ही एकमेकांना भेटत नाही. शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी याठिकाणी जवान तैनात असतात. आम्ही नदीजवळ जाऊ शकतो, मासे पकडू शकतो पण त्याबाजूला जाऊ शकत नाही. कारण त्याबाजूला बांगलादेश आहे असं त्याने सांगितले. 

तर इस्लामपूर बॉर्डरहून याआधी ये-जा सुरू होती. परंतु आता चिघळलेल्या परिस्थितीमुळे कडक बंदोबस्त आहे. १ महिन्यापूर्वी याठिकाणी एवढा बंदोबस्त नव्हता. ये-जा सुरू होती परंतु आता सर्व बंद आहे असं किशनगंजमध्ये राहणाऱ्या जमालनं सांगितले. किशनगंज आणि कटिहारसह बिहारमधील अनेकांची लग्न बांगलादेशात झाली आहेत. नेपाळसारखेच बांगलादेशात भारतीय लोकांची लग्न झालीत. त्यामुळे याठिकाणी बेटी-रोटीचं नाते बांगलादेशासोबत आहे. 

टॅग्स :IndiaभारतBangladeshबांगलादेश