शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

जनतेचा मोदी सरकारवरील विश्वास किंचितसा घटला, मात्र जगात आजही टॉप 3मध्ये भारत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 10:15 IST

देशातील सरकारवर तेथील जनता सर्वाधिक विश्वास ठेवते, अशा देशांच्या यादीत भारत सलग दुस-या वर्षीही टॉप 3 मध्ये आहे.  

नवी दिल्ली - देशातील सरकारवर तेथील जनता सर्वाधिक विश्वास ठेवते, अशा देशांच्या यादीत भारत सलग दुस-या वर्षीही टॉप 3 मध्ये आहे.  दरम्यान, दावोसमध्ये जारी करण्यात आलेल्या 'ग्लोबल ट्रस्ट इंडेक्स'मध्ये भारताच्या या वर्षाची क्रमवारी आणि गुणांमध्ये वर्ष 2017 च्या तुलनेत किंचितशी घसरण झाली आहे. 

गेल्या वर्षी भारत क्रमवारीत अव्वल स्थानावर होता तर या वर्षी तिस-या स्थानावर पोहोचला आहे. जीएसटी आणि नोटाबंदीसारख्या आर्थिक सुधारणांदरम्यान प्रसिद्ध करण्यात आलेल्या 'ग्लोबल ट्रस्ट इंडेक्स'च्या क्रमवारीमुळे भारतातील मोदी सरकारला आणखी उत्साहानं काम करण्याची प्रेरणा मिळेल, असे म्हटले जात आहे.  'ग्लोबल ट्रस्ट इंडेक्स'नुसार, पहिल्या स्थानावर चीन, दुस-या स्थानावर इंडोनेशिया आणि तिस-या क्रमांकावर भारत आहे. 

सरकारव्यतिरिक्त जनतेचं व्यापार वर्ग, एनजीओ आणि मीडियाकडेदेखील कसं पाहते, याचीदेखील दखल घेतली जाते, मात्र याबाबींमध्येही भारत ट्रस्ट झोनमध्ये येत असल्याचं अहवालात समोर आले आहे.  जनतेचा सरकारवरील विश्वासासंबंधीच्या यादीत चीननं 74 अंकांसहीत उंच उडी घेत यादीमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे, दरम्यान 2017मध्ये चीन 67 अंकांसहीत तिस-या क्रमांकावर होतो. तर वर्ष 2017मध्ये भारत 72 अंकांसहीत पहिल्या क्रमांकावर होता. मात्र यंदा 68 अंकांसहीत भारत तिस-या क्रमांकावर घसरला आहे.  

ग्लोबल ट्रस्ट इंडेक्समध्ये सर्वाधिक नुकसान अमेरिकेचं झाले आहे. तर चीनला सर्वाधिक फायदा झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, दुसरीकडे सरकार, मीडिया, एनजीओ आणि व्यापार संबंधित भारतातील जनतेचा सरकारवरील विश्वास पाहिला तर एकूण 13 टक्क्यांनी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, या घसरणीनंतरही भारत विश्वासाच्या श्रेणीमध्ये मोडतो.  

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा