India-America Relation: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय आणि व्हाईट हाऊसचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी भारताबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे मोठा वाद झाला आहे. आता भारताने या वक्तव्यांवर आपली थेट प्रतिक्रिया दिली असून, पीटर नवारोंच्या वक्तव्यांचे स्पष्टपणे खंडन केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (एमईए) स्पष्टपणे सांगितले की, नवारो यांची विधाने केवळ चुकीचीच नाही, तर दिशाभूल करणारीदेखील आहेत.
पीटर नवारोंनी पुन्हा गरळ ओकली, मोदी-पुतिन-जिनपिंग यांच्या भेटीवर केले मोठे विधान
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, भारत आणि अमेरिका यांचे संबंध खोल असून, दिशाभूल करणाऱ्या विधानांमुळे त्यांच्यावर परिणाम होऊ शकत नाही. भारत आणि अमेरिका एक व्यापक आणि जागतिक धोरणात्मक भागीदार आहेत. ही भागीदारी हितसंबंध, लोकशाही मूल्ये आणि मजबूत संबंधांवर आधारित आहे. दोन्ही देशांमधील संबंध अनेक बदल आणि आव्हानांमधून गेले आहेत, परंतु नेहमीच मजबूत राहिले आहेत. ही भागीदारी परस्पर आदर आणि सामायिक हितसंबंधांच्या आधारे पुढे जात राहावी, अशी भारताची इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
क्वाड आणि युक्रेनवरील भारताची भूमिकापरराष्ट्र मंत्रालयाने पुढे म्हटले की, भारत व्यापार मुद्द्यांवर अमेरिकेशी सतत वाटाघाटी करत आहे. त्यांनी क्वाड (भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया) हे सामायिक हितसंबंधांवर चर्चा करण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ असल्याचे वर्णन केले आणि सांगितले की, त्यांच्या पुढील शिखर परिषदेचा निर्णय सदस्य देशांमधील राजनैतिक सल्लामसलत केल्यानंतर घेतला जाईल.
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
युक्रेन संघर्षावर बोलताना, जयस्वाल यांनी अलिकडच्या शांतता प्रयत्नांचे स्वागत केले आणि सांगितले की, भारताला सर्व पक्षांनी रचनात्मक पद्धतीने पुढे जावे अशी इच्छा आहे. त्यांनी पुनरुच्चार केला की, भारताची भूमिका स्पष्ट आहे. हा संघर्ष लवकरच संपला पाहिजे आणि युक्रेनमध्ये कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित झाली पाहिजे. यावेळी त्यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्या अलीकडील पोस्टबद्दल विचारण्यात आले. त्यावर जयस्वाल यांनी बोलण्यास नकार दिला.
भारत आणि रशियाबाबत ट्रम्प यांचे मोठे विधान...डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशलवरील पोस्टमध्ये म्हटले की, 'असे दिसते की, आपण भारत आणि रशियाला धोकादायक चीनच्या हाती गमावले आहे. आशा आहे की, त्यांचे संबंध दीर्घ आणि समृद्ध असतील.' ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टसह राष्ट्राध्यक्ष जिनपिंग, पुतिन आणि पंतप्रधान मोदी यांचा एससीओमधील एक फोटोही पोस्ट केला आहे.
दरम्यान, चीनमध्ये आयोजितएससीओ शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील जवळीक संपूर्ण जगाने पाहिली. या तिन्ही नेत्यांमधील संबंधांनी जगाला सूचित केले की, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या टॅरिफविरोधात एक नवीन जागतिक समीकरण आकार घेत आहे. अनेक तज्ञांनी या बैठकीचे महत्व अधोरेखित केले आहे.
भारत-चीन संबंध सुधारण्याच्या मार्गावरडोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यातच भारतावर ५०% कर लादल्यानंतर भारत-अमेरिका संबंध तणावपूर्ण झाले आहेत. ट्रम्प यांनी चीनवर १४५% इतका मोठा कर लादला होता, परंतु हा निर्णय ९० दिवसांसाठी पुढे ढकलला. ट्रम्प यांचे कठोर कर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पंतप्रधान मोदी आणि भारतावर वारंवार केलेल्या टिप्पण्यांमुळे भारत, चीन आणि रशिया अमेरिकेच्या वर्चस्वाविरोधी एकत्र येत आहेत.
पंतप्रधान मोदी ७ वर्षांनंतर चीनच्या दौऱ्यावर गेले, ज्यामुळे गलवान संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेली कटुता कमी झाली. शी जिनपिंग यांनी पंतप्रधान मोदींचे इतर नेत्यांच्या तुलनेत अतिशय चांगल्या प्रकारे स्वागत केले. द्विपक्षीय बैठकीतही दोन्ही नेत्यांनी प्रतिस्पर्धी न राहता मित्र बनण्याचे, सीमा विवाद सोडवण्याचे आणि व्यापार संबंध मजबूत करण्याचे मान्य केले. चर्चेनंतर जिनपिंग म्हणाले की, ड्रॅगन (चीन) आणि हत्ती (भारत) एकत्र येणे खूप महत्वाचे आहे.