शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बंगालमध्ये I.N.D.I.A.वरील 'ममता' आटली; आता UP, बिहार, पंजाबमध्ये काय होणार? समजून घ्या राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 14:18 IST

आता उत्तर प्रदेश, बिहार आणि पंजाबमध्ये काय होणार? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अखेर लोकसभा निवडणुकीला एकट्याने सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता टीएमसी स्वबळावर लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यांच्याकडून काँग्रेसला केवळ 2 जागांचीच ऑफर देण्यात आली होती. यामुळे काँग्रेस नाराज होती. अखेर ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस आणि डाव्या पक्षांवर राग व्यक्त करत विरोधकांच्या INDIA मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे बंगालमध्ये INDIA मध्ये पहिली फूट पडली आहे. तेथे विरोधकांची आघाडी ढेपाळली आहे. आता उत्तर प्रदेश, बिहार आणि पंजाबमध्ये काय होणार? हे पाहणे महत्वाचे असणार आहे. कारण येथील परिस्थितीही फारशी वेगळी नाही. येथे जागावाटपासंदर्भात एक मेकांना प्रस्ताव दिले गेले आहेत. मात्र अद्याप एकमत झालेले नाही.

बिहारमध्ये जेडीयू आणि आरजेडी यांच्यातच अद्याप लोकसभा जागावाटपासंदर्भात सहमती झालेली नाही. याशिवाय काँग्रेस आणि सीपीआय यांच्यातही पेच आहे. काँग्रेसकडून साधारणपणे अर्धा डझन जागा बिहारमध्ये मागत आहे. मात्र नितीश कुमार आणि लालू यादव काँग्रेसला एवढ्या जागा देण्यास अनुकूल नाहीत. 

अशीच स्थिती उत्तर प्रदेशातही आहे. नुकतीच अखिलेश यादव यांच्यासोबत काँग्रेसच्या आघाडी समितीची बैठक झाली होती. या बैठकीत काँग्रेसने तब्बल 20 जागांचा प्रस्ताव ठेवल्याचे सांगितले जाते. त्यांनी 2009 चा फॉर्म्युला समोर ठेवत मध्य यूपीतील अधिकांश जागांवर दावा केला असून अखिलेश यादव यांच्याकडे 20 जागा मागितल्या आहेत.

अखिलेशही घेऊ शकतात ममतांसारखी भूमिका - काँग्रेसच्या 20 जागांच्या प्रस्तावानंतर सपा देखील नाखूश आहे.  भाजपासोबत थेट टक्कर घेतल्यास काँग्रेस कमकुवत होईल आणि त्यांच्यासाठी जागा काढणे अवघड होईल, असे सपाचे मत आहे. महत्वाचे म्हणजे, खुद्द राहुल गांधी यांनाही अमेठीमद्ये आपली जागा राखता आलेली नाही. उत्तर प्रदेशात काँग्रेस सुल्तानपूर, अमेठी, रायबरेली, शाहजहांपूर, धौरहरा, गाजियाबादसह जवळपास 20 जागांवर दावा करत आहे. या जागा आम्हाला देण्यात याव्यात कारण 2004 अथवा 2009 मध्ये आपण या जागांवर विजय मिळवला होता असा त्यांचा युक्तीवाद आहे. तर 2017 च्या विधानसभा निवडणुकीचा विचार करता काँग्रेसला जागा देणे, म्हणजे, विजयाची शक्यता कमी करण्यासारखे होईल, असे अखिलेश यादव यांना वाटते आहे. तेव्हा सपाने काँग्रेसला 100 जागा दिल्या होत्या. मात्र त्यांना केवळ 7 जागा मिळाल्या होत्या.

पंजाबमध्ये काय होणार...?काहीशी अशीच परिस्थिती पंजाबातही आहे. येथे आम आदमी पार्टी सत्तेवर आहे. लोकसभेतही आपल्याला मोठे यश मिळेल अशी त्यांची धारणा आहे. तर दुसरीकडे आपले 8 खासदार आहेत त्या पेक्षा कमी जागांवर आपण लढणार नाही, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. त्यामुळे येथेही काय होते हे बघण्यासारखे असणार आहे.

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीMamata Banerjeeममता बॅनर्जीUttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहारPunjabपंजाबAAPआपNitish Kumarनितीश कुमारLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवcongressकाँग्रेस