शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

लवकरच होणार INDIA आघाडीची बैठक; जागा वाटपासह या मुद्द्यांवर होणार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 14:34 IST

INDIA Alliance Meeting: लोकसभा निवडणुकीला अवघे काहीच महिने शिल्लक आहेत, त्यामुळे ही बैठक महत्वाची मानली जात आहे.

INDIA Alliance: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपल्या, आता सर्व पक्षांचे लक्ष आगामी लोकसभा निवडणुकांवर लागले आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या 7 ते 8 दिवसांत विरोधी पक्ष्यांच्या INDIA आघाडीची बैठक होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या बैठकीत किमान समान कार्यक्रम आणि जागावाटपावर चर्चा होणार आहे. या बैठकीत विरोधक सामायिक अजेंडाही ठरवणार असल्याची माहिती आहे. 

मार्चच्या पहिल्या आठवड्यात सार्वत्रिक निवडणुकांची तारीख जाहीर होऊ शकते. त्यामुळे तयारीसाठी काहीच महिने शिल्लक आहेत. अशात सत्ताधारी एनडीएचा पराभव करण्यासाठी एकवटलेल्या विरोधकांना लवकरात लवकर सामियिक अजेंडा आणि जागावाटवाचा निर्णय घ्यावा लागेल. विरोधकांनी आतापासून तयारी सुरू केली, तर तरच ते लोकसभा निवडणुकीत भाजपला टक्कर देई शकतील. 

पराभवानंतर काँग्रेसमध्ये मंथन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपने बाजी मारली, तर तेलंगणात काँग्रेसचे सरकार आले. आश्चर्याची बाब म्हणजे राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता होती. अशा स्थितीत निदान छत्तीसगडमध्ये तरी पक्ष आपले सरकार वाचवेल, अशी आशा होती. मध्य प्रदेशातही काँग्रेसचे पुनरागमन निश्चित मानले जात होते. 

मात्र, निवडणुकीचे निकाल समोर आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हिंदी हार्टलँडच्या तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे आता इंडिया आघाडीच्या बैठकीत काँग्रेसला जास्त जागांवर दावा करता येणार नसल्याचेही बोलले जात आहे. काही राज्यांमध्ये इतर पक्षांना जास्त जागा द्याव्या लागतील. 

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारणBJPभाजपा