शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

'इंडिया'त वाद कायम! अखिलेश यादव यांचं भाजपाच्या इशाऱ्यावर काम; कॉंग्रेसची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 17:37 IST

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपावरून समाजवादी पार्टी आणि कॉंग्रेसमध्ये वाद रंगला आहे.

Lok Sabha Elections 2024 : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपावरून समाजवादी पार्टी आणि कॉंग्रेसमध्ये वाद रंगला आहे. मध्य प्रदेशात कॉंग्रेसने आश्वासन दिल्याप्रमाणे सहा जागा सोडल्या नसल्याची टीका अखिलेश यादव यांनी केली. याशिवाय अखिलेश यांनी उत्तर प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांचा उल्लेख' चिरकुट नेता असा केला. अजय राय यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना कॉंग्रेसचे प्रवक्ते सीपी राय यांनी अखिलेश यांना लक्ष्य केले आणि त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती असे म्हटले.  

अखिलेश यांच्यावर टीका करताना सीपी राय म्हणाले, "समाजवादी पार्टी केंद्रातील सत्ताधाऱ्यांमुळे दबावाखाली आहे आणि भाजपाला सत्ता जाण्याची भीती सतावत आहे. त्यामुळेच कॉंग्रेसला हरवण्यासाठी त्यांनी बसपा, ओवैसी आणि आता समाजवादी पार्टीची देखील मदत घेत आहेत. असे असताना देखील पाचही राज्यात भाजपाची स्थिती वाईट आहे आणि कॉंग्रेसचे सरकार स्थापन होण्याची चिन्हे आहेत."

"अखिलेश यादव मुख्यमंत्री राहिले असून पक्षाचे अध्यक्ष आहेत तसेच सुक्षिशितही आहेत.  ते एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे किमान त्यांच्याकडून अशी भाषा अपेक्षित नव्हती. त्यांची भाषा त्यांच्यामधील अस्वस्थता दाखवत आहे. राजकारणात ते खूप जुने आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून संयमाची अपेक्षा आहे", असेही सीपी राय यांनी सांगितले. 

 'इंडिया'त वाद  दरम्यान, मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आघाडीत जागा न मिळाल्याने सपा आणि काँग्रेसमधील विसंवाद चव्हाट्यावर आला आहे. अजय राय म्हणाले की, उत्तर प्रदेशात आम्ही कोणाच्या भरवश्यावर नसून कॉंग्रेस सर्व ८० जागांवर निवडणूक लढवत आहे. याला प्रत्युत्तर देताना अखिलेश यादव म्हणाले, "इंडिया' आघाडीबद्दल बोलण्याची त्यांची कुवत आहे का? मी कॉंग्रेस पक्षाला सांगू शकतो की, 'चिरकुट' नेत्यांना आवर घाला आणि आमच्या पक्षाबद्दल बोलणे टाळायला सांगा."

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टीcongressकाँग्रेसIndiaभारत