शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

सायकल, बैलगाडीतून विश्व पाहणाऱ्या 'इस्त्रो'ची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 1:42 PM

1960 साली स्थापन झालेल्या 'इस्त्रो'ने प्रचंड संघर्ष केला

नवी दिल्ली : देशाच्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदी यांनी 2022 पर्यंत अंतराळामध्ये भारतीयाला पाठविण्याची घोषणा केली. भविष्यात हे शक्य झाल्यास भारताच्या शिरपेचात मानाचे तुरे खोवणाऱ्या भारतीय अंतराळ संशोधन केंद्रासाठी  (ISRO) हे एक मोठे यश असणार आहे. कारण, इस्त्रोने हा टप्पा गाठण्यासाठी प्रचंड संघर्ष केला आहे. 

इस्त्रोने पहिला उपग्रह पाठविण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. एकेकाळी उपग्रह आणि त्याला अवकाशात पाठविण्यासाठी लागणाऱ्या रॉकेटचे सुटे भाग इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी बैलगाड्या आणि सायकलींवरून वाहून नेले होते. इस्त्रोची स्थापना 1960 मध्ये झाली होती. अमेरिकेमध्येही अंतराळात उपग्रह पाठविण्याचे प्रयोग प्राथमिक अवस्थेत होते. अमेरिकेने प्रशांत महासागरात खेळले गेलेल्या टोकिआे ऑलिंपिक खेळांचे थेट प्रसारण केल्यामुळे जगभराचे लक्ष वेधले गेले होते. 

 अमेरिकेच्या सिनकॉम-3 या उपग्रहाने ही किमया साधली होती. यावर प्रभावित होऊन भारताचे अंतराळ मोहिमेचे जनक शास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई यांनी उपग्रहाचे महत्व ओळखले. यानंतर 16 फेब्रुवारी, 1962 ला अणुऊर्जा विभागाने अंतराळ संशोधन राष्ट्रीय समितीची स्थापना केली. यानंतर तुंबा भूमध्य रॉकेट लाँचिंग केंद्राचे काम करायला सुरुवात झाली. 

1963 मध्ये पहिले रॉकेट लाँचयानंतर साधारण वर्षभरातच भारताने आपले पहिलेवहिले रॉकेट लाँच केले. तिरुवनंतपुरम जवळ तुंबा येथे हे केंद्र होते. येथील एका चर्चच्या बाजुलाच असलेल्या फादरच्या घरात कार्यालय बनविण्य़ात आले. तसेच चर्चच्या इमारतीत नियंत्रण कक्ष उघडण्यात आला. 21 नोव्हेंबर, 1963 मध्ये तुंबा येथून सोडलेल्या रॉकेटचे निरीक्षण उघड्या डोळ्यांनी म्हणजेच दुर्बिनीशिवाय केले गेले. रॉकेटमधून निघणाऱ्या धुराद्वारे या रॉकेटचे ट्रॅकिंग केले गेले. यापुर्वी रॉकेटचे सुटे भाग बैलगाडी, सायकलच्या साह्याने लाँच पॅडपर्यंत पोहोचविण्यात आले होते. 

12 वर्षांनी पहिला उपग्रह झेपावलाया दरम्यान बरेच प्रयोग केले गेले. शेवटी एका तपानंतर रशियन रॉकेटच्या सहाय्याने 19 एप्रिल, 1975 ला भारताचा पहिला उपग्रह 'आर्यभट्ट' अंतराळात झेपावला. यावेळीही इस्त्रोकडे मुलभूत सुविधाही नव्हत्या. बेंगळुरुमध्ये यावेळी स्वच्छतागृहाचे रुपांतर वेळ दाखविणाऱ्या केंद्रामध्ये केले गेले होते. आज आपला देश दुसऱ्या देशांच्या उपग्रहांचे निर्माण करण्याबरोबरच त्यांचे प्रक्षेपणही करतो. एवढी मजल गाठण्यासाठी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांना अनंत समस्यांचा सामना करावा लागला होता. 

यानंतर इस्त्रोने कधीही मागे वळून पाहिले नाही. 1980 मध्ये पहिल्या स्वदेशी सॅटेलाईट व्हेईकल एसएलव्ही-3 द्वारे रोहिणी उपग्रहाला कक्षेत सोडण्यात आले. आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथून हा उपग्रह सोडण्यात आला होता. यानंतर भारत अंतराळामध्ये दबदबा असणाऱ्या सहा देशांच्या यादीत विराजमान झाला. 

ऑक्टोबर 2008 मध्ये चंद्रयान मोहिमेने तर इस्त्रोला चार चाँद लावले. चांद्रयान-1 ये यान 2009 पर्यंत कार्यरत होते. महत्वाचे म्हणजे या मोहिमेची घोषणा माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 2003 सालच्या स्वातंत्र्य दिनादिवशीच केली होती. इस्त्रो यंदा चांद्रयान-2 ला पाठविण्याची तयारी करत आहे.

मंगळयान मोहिमेने उडविली जगाची झोपइस्त्रोच्या मंगळयान मोहिमेने 2013 मध्ये भल्याभल्या शक्तींची झोप उडवली. आशियातून मंगळावर पाऊल ठेवणारी इस्त्रो ही एकमेव. शेजारच्या प्रतिस्पर्धी चीनलाही अद्याप मंगळवारी जमलेली नाही. हे यान 24 सप्टेंबर, 2014 ला मंगळावर यशस्वीरित्या पोहोचले. 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवसisroइस्रोNarendra Modiनरेंद्र मोदी