शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील पोलिसांचा सन्मान; ८४ राष्ट्रीय पदके जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 05:26 IST

Independence Day : जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील पोलिसांना सर्वाधिक १२५ पोलीस पदके व त्यानंतर महाराष्ट्राला ८४ पोलीस पदके जाहीर झाली. निमलष्करी दलांमध्ये सीआरपीएफला १७१ व त्यानंतर बीएसएफला ७० पोलीस पदके मिळाली आहेत.

नवी दिल्ली/ मुंबई  : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील १०८२ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस पदके जाहीर झाली. त्यात महाराष्ट्रातीलपोलिसांना उल्लेखनीय सेवेसाठी तीन राष्ट्रपती पदके, ४२ शौर्य पदके व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ३९ पदकांचा बहुमान मिळाला.

जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील पोलिसांना सर्वाधिक १२५ पोलीस पदके व त्यानंतर महाराष्ट्राला ८४ पोलीस पदके जाहीर झाली. निमलष्करी दलांमध्ये सीआरपीएफला १७१ व त्यानंतर बीएसएफला ७० पोलीस पदके मिळाली आहेत. जम्मू-काश्मीरने सर्वाधिक पोलीस पदके मिळविली असून, त्यात १०८ शौर्य पदके, उल्लेखनीय सेवेसाठी २ राष्ट्रपती पदके, गुणवत्तापूर्ण सेवेसाठी १५ पदकांचा समावेश आहे. सीबीआयला ३० पोलीस पदकांचा बहुमान मिळाला आहे.

एकूण पोलीस पदकांमध्ये ३४७ शौर्य पदके, उल्लेखनीय सेवेसाठी ८७ राष्ट्रपती पदके व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ६४८ पोलीस पदकांच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली. निमलष्करी दलांमध्ये सर्वात जास्त १०९ शौर्य पदके सीआरपीएफला मिळाली. सीमा सुरक्षा दल (बीएसएफ)ला १९, तर इंडो-तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) व सशस्त्र सीमा बल (एसएसबी) यांना प्रत्येकी ६ शौर्य पदके मिळाली. 

राज्यातील तिघांना सेवेसाठी राष्ट्रपती पदकमहाराष्ट्रातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदके मिळाली. त्यात सुनील कोल्हे (सहआयुक्त, राज्य गुप्तचर विभाग, कुलाबा), प्रदीप कन्नलू (सहायक आयुक्त, वायरलेस विभाग, ठाणे), मनोहर धनावडे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ओशिवरा पोलीस ठाणे, मुंबई) यांचा समावेश आहे.

परराज्यातील मराठी अधिकाऱ्यांचा सन्मानहरयाणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक श्रीकांत जाधव (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) यांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक मिळाले. तेलंगणातील अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचे अधिकारी महेश भागवत (हैदराबाद परिक्षेत्रातील रचाकोंडाचे पोलीस आयुक्त) यांनाही हेच पदक जाहीर झाले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रIndependence Dayस्वातंत्र्य दिन