शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

भारीच! हर घर तिरंगा अभियानामुळे झाला तब्बल 500 कोटींचा व्यापार: 10 लाख लोकांना रोजगार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 15:07 IST

Independence Day 2022 : हर घर तिरंगा अभियानाने भारतीय उद्योजकांची क्षमताही दाखवून दिली आहे. ज्यांनी देशातील जनतेची तिरंग्याची अभूतपूर्व मागणी पूर्ण करण्यासाठी सुमारे 20 दिवसांच्या विक्रमी वेळेत 30 कोटींहून अधिक तिरंग्यांची निर्मिती केली.

नवी दिल्ली-  स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या हर घर तिरंगा अभियानामुळे आत्मनिर्भर भारत उपक्रमाला प्रोत्साहन दिले आहे. यावेळी हर घर तिरंगा अभियानामुळे देशभरात 30 कोटींहून अधिक राष्ट्रध्वजांची विक्री झाली असून, तिरंग्याबाबत व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजापेक्षा जास्त आहे. त्यामुळे जवळपास 500 कोटी रुपयांचा व्यवसाय झाला आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे म्हणणे आहे की देशभक्ती आणि स्वयंरोजगाराच्या या अभियानामुळे देशभरातील लोकांमध्ये देशभक्तीची एक अद्भुत भावना आणि को-ऑपरेटिव्ह व्यवसायाची शक्यता निर्माण झाली आहे. 

कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतिया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 15 दिवसांत मोठ्या संख्येने व्यापारी संघटनांनी CAT च्या झेंड्याखाली देशभरात 3000 हून अधिक तिरंगा कार्यक्रम आयोजित केले ज्यामध्ये मोठ्या संख्येने लोकांनी स्वइच्छेने भाग घेतला. व्यापाऱ्यांसह विविध क्षेत्रातील लोकांनी पुढे जाऊन तिरंग्याची शान कायम ठेवली. हर घर तिरंगा अभियानाने भारतीय उद्योजकांची क्षमताही दाखवून दिली आहे. ज्यांनी देशातील जनतेची तिरंग्याची अभूतपूर्व मागणी पूर्ण करण्यासाठी सुमारे 20 दिवसांच्या विक्रमी वेळेत 30 कोटींहून अधिक तिरंग्यांची निर्मिती केली.

CAT च्या आवाहनावर, देशभरातील व्यापारी संघटनांनी सर्व राज्यांमध्ये रॅली, मिरवणुका, तिरंगा गौरव यात्रा, सार्वजनिक सभा आणि परिषदांसह तिरंगा कार्यक्रम आयोजित करून देशभक्तीची भावना जागृत केली. भरतिया आणि खंडेलवाल म्हणाले की, केंद्र सरकारने पॉलिस्टर आणि मशीनद्वारे बनवलेल्या ध्वजांना परवानगी देणार्‍या ध्वज संहितेत केलेल्या बदलांमुळेही देशभरात ध्वज सहज उपलब्ध होण्यास मोठा हातभार लागला आहे. पूर्वी भारतीय तिरंगा फक्त खादी किंवा कापडात बनवण्याची परवानगी होती. ध्वज संहितेतील या दुरुस्तीमुळे देशातील 10 लाखांहून अधिक लोकांना रोजगार मिळाला, ज्यांनी स्थानिक शिंपींच्या मदतीने त्यांच्या घरी किंवा छोट्या ठिकाणी तिरंगा ध्वज मोठ्या प्रमाणावर बनवला.

एसएमई उत्पादन आणि व्यापार क्षेत्राने अत्यंत संघटित पद्धतीने मोठ्या संख्येने भारतीय ध्वज तयार करण्यासाठी रात्रंदिवस काम केले. सामान्यतः बनवलेल्या ध्वजाच्या विविध आकारांमध्ये 6800×4200 mm, 3600×2400 mm, 1800×1200 mm, 1350×900 mm, 900×600 mm, 450×300 mm, 225×150 mm आणि 05h mm चा समावेश आहे. याआधी स्वातंत्र्य दिनानिमित्त, भारतीय तिरंग्याची वार्षिक विक्री सुमारे 150-200 कोटी रुपयांपर्यंत मर्यादित होती. तर हर घर तिरंगा अभियानामुळे विक्री अनेक पटींनी वाढून 500 कोटी रुपये झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनIndiaभारत